Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यारुग्णालयांच्या ऑक्सिजन पुरवठ्यासाठी उद्योगांचे सिलेंडर जमा

रुग्णालयांच्या ऑक्सिजन पुरवठ्यासाठी उद्योगांचे सिलेंडर जमा

सातपूर । प्रतिनिधी

करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. प्रशासनाने रुग्णालयांची गरज ओळखून उद्योगांचा ऑक्सिजन रुग्णालयाकडे वळवला आहे. त्यासाठी आवश्यक असणार्‍या सिलेंडरची पूर्तता करण्यासाठी नुकतेच उद्योगांमधून 1250 सिलेंडरही जमा करून घेण्यात आले आहेत.

- Advertisement -

ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात लॉकडाऊन करताना उद्योग सुरू ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार 80 टक्के ऑक्सिजन पुरवठा रुग्णांना व 20 टक्के उद्योगांना देण्याचे निश्चित केले होते. मात्र गेल्या काही दिवसात रुग्णालयात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा दिसू लागला आहे. या पार्श्वभूमीवर उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा शून्य टक्के करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

त्यानुसार औद्योगिक क्षेत्राला पुरवले जाणारे संपूर्ण ऑक्सिजन रुग्णालयांकडे वाढवण्यात आले आहे. उद्योग वाचलाच पाहीजे मात्र, त्यापूर्वी माणसांचे जीव वाचवणे हा महत्त्वाचा भाग दृष्टीपथात ठेवण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून औद्योगिक क्षेत्रातील ऑक्सीजन सिलेंडर जमा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत सुमारे 1250 सिलेंडर जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून जमा करण्यात आले आहेत.

ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी सिन्नर येथील श्री गणेशा व स्वस्तिक या दोन उद्योगांना सक्षम करून लवकरच तेथे ऑक्सिजन उत्पादन केले जाणार आहे. त्यामुळे येणार्‍या काळात ऑक्सिजनची अडचणही बर्‍यापैकी कमी होण्यास मदत होईल असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या