सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू

सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू

सिन्नर । Sinnar

खंबाळे येथील सुट्टीवर आलेल्या लष्करी (military) जवानाचा नाशिक-पुणे महामार्गावर (Nashik-Pune highway) नांदुरशिंगोटे परिसरात अपघाती मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. जितेंद्र संपत आंधळे (28) (Jitendra Sampat Andhale) असे मृत जवानाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी ज्योती, सात वर्षीय मुलगा पियुष, तीन वर्षीय मुलगी आरोही असा परिवार आहे.

जितेंद्र हे केरळ येथे 23 मराठा बटालियनमध्ये (Maratha Battalion) कार्यरत होते. त्यांची नुकतीच कर्नाटक येथे बदली झाल्याने ते पत्नी व मुलांना गावी ठेवून नवीन नियुक्ती झालेल्या ठिकाणी कर्तव्यावर हजर होणार होते. त्यासाठी ते सुट्टी काढून गावी आले होते.

काही दिवसांचीच सुट्टी असल्याने ते सर्वच नातेवाईकांना भेटण्यासाठी फिरत होते. गुरुवारी रात्री ते पत्नी व मुलांना घेऊन मानोरी येथे सासरवाडीला गेले होते. त्यांना तिथे सोडून त्यांचे साडू ज्ञानेश्वर सांगळे यांच्यासोबत नातेवाईकांना भेटण्यासाठी नांदूरशिंगोटे (Nandoorshingote) येथे गेले होते. तेथे नातेवाईकांना भेटून पुन्हा खंबाळेला जात होते. 

दरम्यान, नाशिक-पुणे महामार्गावरील नांदूरशिंगोटे बायपास जवळ त्याचा अपघात झाला. दुचाकीवरुन जात असताना समोरुन येणाऱ्या वाहनाच्या हेडलाइट प्रकाशामुळे आंधळे यांचे डोळे दिपले. त्यानंतर त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ते दुचाकी थेट दुभाजकाला जाऊन धडकली. यात आंधळे यांच्या डोक्याला जबर मार लागला. दुचाकीवर पाठीमागे बसलेले ज्ञानेश्वर सांगळे हे जखमी झाले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

स्थानिकांनी मदत करत त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती समजतात वावी पोलीस ठाण्याचे (Vavi Police Station) सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे,  उपनिरीक्षक आर टी तांदळकर यांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, आंधळे यांच्या अपघाती मृत्यूनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. आज (दि.24) दुपारी शासकीय इतमामात खंबाळे येथे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com