...अन् अपघातग्रस्ताला JCB ने पोहोचवले रुग्णालयात, पाहा VIDEO

...अन् अपघातग्रस्ताला JCB ने पोहोचवले रुग्णालयात, पाहा VIDEO

दिल्ली | Delhi

अनेकदा रस्ता अपघातात कोणी जखमी होताना पाहतो, मात्र तेव्हा बहुतेक लोक अपघाताबद्दल चर्चा करून निघून जातात.

भारतात रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढतच आहे, त्याची कारणे अनेक आहेत. मात्र यामागील मुख्य कारण म्हणजे जखमी व्यक्तीला वेळेवर रुग्णालयात पोहोचणे शक्य नाही. याच दरम्यान एक माणुसकीच दर्शन घडवणारी घटना समोर येत आहे.

मध्य प्रदेशमध्ये एका व्यक्तीचा अपघात झाला. त्याची प्रकृती चिंताजनक होती. त्या अपघातग्रस्ताला तातडीने वैद्यकीय मदतीची गरज होती. मात्र, रुग्णवाहिका वेळेत पोहोचू शकली नाही.

त्यानंतर स्थानिक नागरिकांनी जेसीबीच्या बकेटमधून या अपघातग्रस्ताला रुग्णालयात पोहोचवले आणि वैद्यकीय मदत उपलब्ध करुन दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com