मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात, ५ जणांचा जागीच मृत्यू

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात, ५ जणांचा जागीच मृत्यू

मुंबई | Mumbai

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर (Mumbai-Pune Expressway) झालेल्या भीषण अपघातात 5 जण ठार तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बोरघाटात (Bhor Ghat Accident) घडली.

मुंबईच्या दिशेने निघालेल्या या कारला एका वाहनाने धडक दिली. त्यामुळे हा अपघात झाला आहे. या धडकेमुळे गाडी रस्त्याकडेला जाऊन पडली आणि दरवाजा तुटल्याने प्रवासी बाहेर पडले. अति रक्तस्त्रावामुळे काहींचा मृत्यू झाला.

सगळे मृत व्यक्ती एकाच कुटुंबातले असल्याचे प्राथमिक माहिती हाती येत आहे. मृतांची आणि जखमींची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. जखमींना पनवेलमध्ये एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com