मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात; एकाचा मृत्यू; दोन जण गंभीर जखमी

मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात; एकाचा मृत्यू; दोन जण गंभीर जखमी

घोटी | जाकीर शेख Ghoti

मुंबई आग्रा महामार्गावरील ( Mumbai -Agra Highway ) गोंदे दुमाला (Gonde Dumala ) फाट्यावर मुंबईकडे जात असलेल्या आयशर गाडीला कोंबड्यांंची वाहतूक करणाऱ्या गाडीने मागून धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात १ जण जागीच ठार झाला तर दोन जन गंभीर जखमी झाले आहेत.

मुंबई आग्रा महामार्गावर गोंदे दुमाला जवळ आयशर गाडी क्र. MH.48.T.2022 मुंबईकडे जात असतांना मागुन येणारी कोंबड्याची वाहतुक करणारी आयशर MH.47.Y.7680 या गाडीने पुढे जाणाऱ्या आयशरला मागुन जोरदार धडक दिल्याने जोरदार अपघात झाला. या अपघातात कोंबड्याची वाहतुक करणाऱ्या गाडीतील राजेंद्र वर्मा, वय २२ वर्ष, राहाणार कांदीवली, मुंबई हा जागीच ठार झाला. तर मोहम्मद दिलसाद शेख, वय २९, सफिक मुसुफा अहमद, वय २१ वर्ष हे गंभीर जखमी झाले .

अपघाताची माहिती समजताच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे चालक निवृत्ती पा. गुंड यांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ मदतकार्य करून दोन्ही जखमींना घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून अपघातग्रस्त व्यक्तींचा जीव वाचवला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com