माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ दोन एक्स्प्रेसची धडक; तीन डबे रुळावरून घसरले

माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ दोन एक्स्प्रेसची धडक; तीन डबे रुळावरून घसरले

मुंबई | Mumbai

माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ दोन एक्स्प्रेस समोरासमोर आल्याचे समजते. यात प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या पुदुच्चेरी एक्स्प्रेसला गदग एक्स्प्रेसच्या इंजिनने धडक दिल्याने मोठा अपघात झाला आहे. यामूळे पुदुच्चेरी एक्स्प्रेसचे मागच्या बाजूचे ३ डबे रुळावरून घसरल्याची माहिती मिळत आहे....

या दोन्ही एक्स्प्रेसची धडक झाल्यानंतर मोठा आवाज झाला. यामुळे गदग एक्स्प्रेसमधील सर्व प्रवाशांनी बाहेर उड्या मारल्या. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे.

या अपघातामुळे जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

ही घटना रात्री ९ वाजून ४५ मिनिटांनी ही घटना घडली आहे. या घटनेमध्ये अद्याप कुणी जखमी झाल्याची माहिती मिळालेली नाही.

Related Stories

No stories found.