मनमाडजवळ किसान एक्स्प्रेसचा अपघात; दोन डबे रुळावरून घसरले

मनमाडजवळ किसान एक्स्प्रेसचा अपघात; दोन डबे रुळावरून घसरले

मनमाड | Manmad

किसान एक्स्प्रेसचे (Kisan Express) दोन डबे रुळावरून घसरल्याची घटना काही वेळापूर्वी घडली आहे. मनमाडपासून (Manmad) अवघ्या दोन किमी अंतरावर हा अपघात (Accident) झाला आहे...

ही एक्स्प्रेस पुणे (Pune) येथून दानापूरकडे (Danapur) जात असताना मनमाडजवळ रुळावरून खाली घसरल्याने अपघात झाला. गाडीचा वेग कमी असल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

याबाबत माहिती मिळताच तांत्रिक विभागाच्या कर्मचाऱ्यांसह रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घसरलेले डबे बाजूला करण्याचे काम सुरू केले. अपघातामुळे पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली.

Related Stories

No stories found.