Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यापिंपळगाव (ब) जवळ अपघात, एकाचा मृत्यू

पिंपळगाव (ब) जवळ अपघात, एकाचा मृत्यू

पिंपळगाव (ब) | प्रतिनिधी

शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai-Agra Highway) पाचोरे फाटा शिवारात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मारुती कार पलटी होऊन अपघात (accident) झाला. या अपघातात तारकेश अनिल दीक्षित (वय ३५ रा. नाशिक) यांचा मृत्यू झाला, तर वाहनातील अन्य दोघे किरकोळ जखमी असून पिंपळगाव पोलीस ठाण्यात (Pimpalgaon Police Station) अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई आग्रा महामार्गावर पाचोरे फाटा शिवारात धुळ्याकडून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या मारुती कार क्रमांक एम एच ०२ सी पी २९९६ ही वेगात असल्याने चालकाचे वाहनवरील नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाली. यामुळे वाहनातील तारकेश अनिल दीक्षित यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

वाहनात असणारे इतर, अरविंद मनोहर जोशी (वय ६०), आशा अरविंद जोशी (वय ५५) आदी किरकोळ जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. यासंदर्भात पिंपळगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या