Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकच्या औद्योगिक विकासाला गती

नाशिकच्या औद्योगिक विकासाला गती

नाशिक । प्रतिनिधी Nashik

उद्योगांच्या विकासाला ( Industrial Devlopment ) प्रशासनाच्या माध्यमातून गती देण्याचे काम सुरू असून, दिंडोरीच्या अतिरिक्त औद्योगिक वसाहतीत ( Dindori MIDC )सुमारे 9 लाख 931 चौरस मिटर जागांचे वाटप करण्यात आले असून, या माध्यमातून 5 हजार 901 कोटींची गुंतवणूक होेणार असल्याचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी सांगितले.

- Advertisement -

नाशिकच्या औद्योगिक विकासाला गती मिळत असून येणार्‍या काळात आणखी जागा उपलब्ध करुन घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. शासनोच्या 2020 ते 2022 या दोन वर्षाच्या दरम्यान झालेल्या जागा वाटप बैठकींतून अतिरिक्त दिंडोरी औद्योगिक वसाहतीतील 9 लाख चौरस फुटाच्या 41 औद्योगिक प्लॉटवर सुमारे 6 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.

या उद्योग क्षेत्राच्या माध्यमातून सुमारे 5 हजार बेरोजगारांना नवे रोजगार निर्माण होणार असल्याने उद्योग क्षेत्रातून समाधान व्यक्त केले जात आहे. एका उद्योगासोबतच त्याच्या इतर सहउद्योगांना गती मिळत असल्याने या माध्यमातून उद्योग क्षेत्रात आलेली मरगळ झटकली जाणार असल्याचे दिसून येत आहे.

नाशिकच्या उद्योग क्षेत्रात जागा उपलब्ध नसल्याने उद्योगांची मागणी लक्षात घेता जिल्ह्यातील विविध भागातून जागा अधिग्रहण करण्याला गती देण्यात आलेली आहे. नाशिक परिसरातील राजूर बहुला (144.43हेक्टर), सिन्नरमधील मापारवाडी (230.67 हेक्टर), दिंडोरीीमधील जांबूटके(31.51 हेक्टर) भूसंपादनाचे नियोजन करण्यात आलेले आहे. यामुळे येणार्‍या काळात नाशिकच्या उद्योग उभारणीला गती मिळणार असल्याचे चित्र आहे.

नाशिकमध्ये उद्योग विस्ताराला पोषक वातावरण असून, उद्योगांना आवश्यक असलेल्या जागेची उपलब्धताही करुन देण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात नाशिकच्या उद्योग वाढीला गती मिळणार आहे. –

नितीन गवळी,प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी

- Advertisment -

ताज्या बातम्या