मनपाकडून कर वसुलीमध्ये गती; 'इतक्या' कर्मचार्‍यांचे अतिरिक्त मनुष्यबळ

मनपाकडून कर वसुलीमध्ये गती; 'इतक्या' कर्मचार्‍यांचे अतिरिक्त मनुष्यबळ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील विविध थकबाकी (arrears) कर वसुलीमध्ये (Tax collection) गती होण्यासाठी तसेच उद्दिष्ट पृथ्वीच्या दिशेने वसुली गतिमान करण्यासाठी

विविध कर विभाग (Tax Department) सज्ज झाले असेल महापालिकेतील सर्वच विभागांतून 155 कर्मचार्‍यांचे अतिरिक्त मनुष्यबळ (Additional manpower) या विशेष मोहिमेसाठी वर्ग करण्यात आला आहे.

मनपा आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली अधिकार्‍यांनी झालेल्या नियोजन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, त्या माध्यमातून शहराच्या 31 प्रभागांमध्ये पाच जणांच्या टीमच्या माध्यमातून अतिरिक्त उत्पन्नाचे स्त्रोत शोधण्याचे काम सुरू होणार आहे. त्या प्रामुख्याने नवीन मालमत्तांचा शोध घेणे वापरातील झालेले बदल नोंदणी पेक्षा जास्त इंचाची पाणी जोडणी तसेच मोठे कॉम्प्लेक्स (complex), हॉटेल (hotels), अनधिकृत बांधकामे (Unauthorized constructions) कमी क्षमतांची नोंदणी असलेले आणि ज्यादा वापर करत असलेले रुग्णालय, टेरेस व लॉजिंगची वाढलेली संख्या या सर्व गोष्टींचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी 31 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या पुस्तकांमध्ये एक अभियंता तीन लिपिक व एक शिपाई असणार आहे या पथकांच्या माध्यमातून शहराच्या नियुक्त केलेल्या प्रभागातील सर्व गोष्टींचा विशेष स्तरावर अभ्यास केला जाणार आहे ही मोहीम 26 ते 29 या दरम्यान राबवली जाणार आहे यासाठी मनपाच्या विविध विभागातील 155 कर्मचारीवसूली मोहीमेला वर्ग करण्यात आले असले तरी विविध विकास विभागाचे कर्मचारी मात्र जुन्या वसूलीवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे समजते.

मनपाच्या विविध कर विभागाच्या माध्यमातूनआज पर्यंत 141 कोटीची वसूली करण्यात आलेली असून, विविध शासकिय आस्थापनांना नोटीस बजावण्यात आल्याने त्यामाध्यमातून जून्या थकबाकीच्या रमांची वसूली होणार आहे. काही शासकिय कार्यालयांनी भरणा करण्यास सूरूवात केलेली असल्याचे वृत्त आहे. मागिल वर्षी 31 जानेवारी पर्यंत 149 कोटी रुपयांची वसूली झालेली होती. यंदाच्या विशेष मोहीमेमुले त्यापेक्षा जास्त वसूलीची शक्यता वर्तवली जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com