सिंचनासाठी सौर कृषीपंप योजनेला गती

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शेतकरी बांधवांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेतून (CM Solar Agriculture Pump Scheme ) गती देण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यातील 85 हजार 963 शेतकर्‍यांकडे तीन, पाच व 7.5 अश्वशक्तीचे सौर कृषी पंप कार्यान्वित करण्यात आले आहेत. नाशिक( Nashik )परिमंडलात 6 हजार 557 सौर कृषी पंप असून यामध्ये नाशिक जिल्ह्यात 3 हजार 998 तर अहमदनगर जिल्ह्यातील 2 हजार 569 सौर कृषिपंपाचा समावेश आहे. या सर्व शेतकर्‍यांना दिवसा विनाव्यत्यय वीजपुरवठा उपलब्ध झाला असून वीजबिलांतून ( Electricity Bills ) देखील मुक्तता झाली आहे.

पारंपरिक पद्धतीने कृषी पंपाची वीजजोडणी न झालेले व महावितरणकडे वीजजोडणीसाठी पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषिपंपांना सौरऊर्जेद्वारे दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून पारेषणविरहित नवीन वीजजोडण्या देण्यात येत आहे. तसेच अतिदुर्गम व आदिवासी भागातील शेतकर्‍यांना प्राधान्य देण्यात येत आहे. त्यासाठी सौर कृषिपंपाच्या आधारभूत किंमतीपैकी सर्वसाधारण गटासाठी 10 टक्के तर अनुसूचित जाती/जमाती गटातील शेतकर्‍यांसाठी 5 टक्के लाभार्थी हिस्सा आहे.

या योजनेअंतर्गत एक लाख सौर कृषिपंप आस्थापित करण्याचे उद्दिष्ट आहे. राज्यातून आतापर्यंत 2 लाख 40 हजार 617 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 97 हजार 9 लाभार्थ्यांनी मागणी पत्राचा (डिमांड नोट) भरणा केला आहे तर 96 हजार 191 लाभार्थ्यांनी स्वतः निवडसूचीतील संबंधीत पुरवठादारांची निवड केली आहे. त्यातील 85 हजार 963 सौर कृषिपंप आस्थापित करण्यात आले आहेत. यामध्ये औरंगाबाद प्रादेशिक विभागात 46 हजार 700, नागपूर प्रादेशिक विभाग- 20 हजार 199, कोकण प्रादेशिक विभाग- 13 हजार 91 आणि पुणे प्रादेशिक विभागामध्ये 5 हजार 973 सौर कृषिपंप आस्थापित करण्यात आले आहेत.

तर आवश्यक कागदपत्र जोडलेले नसणे, स्थळ तपासणीनंतर कृषिपंपाची वीजजोडणी आढळून येणे, जलस्त्रोत नसणे, विहीर किंवा कूपनलिका 60 मीटरपेक्षा खोल असणे तसेच डिमांड नोट दिल्यानंतरही लाभार्थी हिस्सा न भरणे आदी कारणांमुळे 1 लाख 24 हजार 692 अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *