कृषी टर्मिनलमुळे विकासाला गती: पालकमंत्री भुजबळ

कृषी टर्मिनलमुळे विकासाला गती: पालकमंत्री भुजबळ

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

शहरातील सय्यद पिंप्री (Syyad Pimpri) येथे उभारण्यात येणार्‍या नियोजित कृषी टर्मिनलच्या (Agricultural Terminal) माध्यमातून शेतकर्‍यांसाठी (farmers) मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.

शेतकर्‍यांच्या हितासाठी असणार्‍या या प्रकल्पामुळे विकासाला गती (Accelerate development) मिळणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांनी केले. शहरातील सय्यद पिंप्री येथील कृषी टर्मिनल प्रकल्पाच्या (Agricultural Terminal Project) जागेची पाहणी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली.

त्यावेळी त्यांनी सर्व्हे नं 1654 मधील 100 एकर जागा या प्रकल्पाला लवकर उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या. यावेळी आमदार सरोज अहिरे (MLA Saroj Ahire), प्रांताधिकारी अरविंद नरसीकर, तहसीलदार अनिल दौंडे, पणन विभागाचे उपमहाव्यवस्थापक बहाद्दूर देशमुख, व्यवस्थापक अभियांत्रिकी हेमंत अत्तरदे, सरपंच मधुकर ढिकले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, जिल्ह्यातील उत्पादित शेतमालाला देशासह परदेशात मोठी मागणी आहे. हे कृषी टर्मिनल उभारल्याने शेतकर्‍यांचा थेट बाजाराशी संपर्क प्रस्थापित करून उत्पादनाच्या विक्रीस पर्याय उपलब्ध करून देता येणार आहे. तसेच ओझर विमानतळ (Ozar Airport) व राष्ट्रीय महामार्ग (National Highways) जवळ असल्याने दळणवळणाची सुविधाही उपलब्ध असणार आहे. कृषी टर्मिनल मार्केटमुळे शेतमाल आणि फलोत्पादनाच्या विक्रीच्या प्रचलित पद्धतीमुळे होणारे नुकसान कमी होण्यास मदत होणार आहे.

तसेच या कृषी टर्मिनल मार्केटमध्ये फळे आणि भाजीपाला, अन्नधान्य, पोल्ट्री, मांस, दुग्धजन्य पदार्थांची व उत्पादनाची साठवणूक करता येणार असून या कृषी टर्मिनलमुळे शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. या अनुषगंगाने आज या जागेची पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी करून प्रकल्पाच्या कामाला गती देण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com