Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रपिंपरी-चिंचवड महापालिकेत एसीबीचा छापा; स्थायीचे अध्यक्ष ताब्यात

पिंपरी-चिंचवड महापालिकेत एसीबीचा छापा; स्थायीचे अध्यक्ष ताब्यात

पुणे | Pune

पिंपरी-चिंचवड महापालिकेत (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (anti corruption bureau) छापा मारला आहे….

- Advertisement -

महापालिकेत आज स्थायी समितीची बैठक संपताच एसीबीकडून कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेतील स्थायी समिती कार्यालयाचा एसीबीने ताबा घेतल्याने खळबळ उडाली आहे.

पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे (Nitin Landage) आणि त्यांच्या पीएला एसीबीने (ACB) चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पुण्यातील कार्यालयामध्ये त्यांना नेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

आज पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्थायी समितीची बैठक असल्याने ठेकेदारदेखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थायीची बैठक संपताच एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली. मनपाच्या इमारतीत पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एसीबीचे अधिकारी तेथील कागदपत्रांची तपासणी करत असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या