नाशकात 'मोठा मासा' एसीबीच्या जाळ्यात; तब्बल २८ लाखांची लाच घेताना पकडले रंगेहाथ

नाशकात 'मोठा मासा' एसीबीच्या जाळ्यात; तब्बल २८ लाखांची लाच घेताना पकडले रंगेहाथ

नाशिक | प्रतिनिधी Nashik

ठेकेदाराला मिळालेल्या कामाचा आरंभ करण्यासाठी २८ लाख ८० हजार रुपयांची लाच ( Bribe )मागणाऱ्या सार्वजनिक बांधकाम आदिवासी विकास विभागातील (Public Works Tribal Development Department)कार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ( ACB)सापळा रचत अटक केली.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि,आर के इन्फ्रा . कॉन्स्ट्रो प्रा. ली. या फर्मचे नाशिक जिल्ह्यातील हरसुल येथील मुला-मुलींचे वस्तीगृहातील सेंट्रल किचनचे काम सुरू करण्यासाठी लागणारा कार्यारंभ आदेश देण्याच्या मोबदल्यात कामाच्या एकूण रकमेच्या १२ टक्के रक्कम २८ लाख ८० हजार रुपये लाचेची मागणी दिनेश कुमार बुधा बागुल( ५० ,धंदा.नोकरी कार्यकारी अभियंता,सार्वजनिक बांधकाम ,आदिवासी विकास विभाग, विभागीय कार्यालय,नाशिक) यांनी(दि.१९ ऑगस्ट) केली होती.

नाशकात 'मोठा मासा' एसीबीच्या जाळ्यात; तब्बल २८ लाखांची लाच घेताना पकडले रंगेहाथ
प्रेमसंबंध तोडल्याचा राग अनावर; नाशकात महिलेवर कोयत्याने वार

दरम्यान तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करून तक्रार दिली असता पोलीस अधीक्षक सुनील कडासने,अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे,वाचक उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक अनिल बागुल,अंमलदार किरण अहिरराव, अजय गरुड,नितीन कराड,संतोष गांगुर्डे,मानकर यांनी तब्बल आठवडाभर सापळा रचला असता (दि.२५) बागुल याला तक्रारदाराकडून २८ लाख ८० हजार रुपयांची लाच घेतांना अटक करण्यात आली. दरम्यान बागुल याच्या संपत्ती बाबत देखील पोलीस तपास करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com