अल्पवयीन मुलीवर अत्याचार; डॉक्टर अटकेत

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; डॉक्टर अटकेत

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका नामांकित हॉस्पिटल मधील डॉक्टरने ( Doctor )त्याच्या येथे प्रशिक्षण घेणाऱ्या परिचारिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात ( Ambad Police Station ) पोस्को व ॲट्रॉसिटी (POSCO and Atrocity)अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की विजय नगर परिसरामध्ये असलेल्या स्वामी हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर उल्हास कुटे यांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या अल्पवयीन परिचारिकेवर लैंगिक अत्याचार केला.

याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात डॉक्टर कुटे याच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार पोस्को व ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित डॉक्टर उल्हास कुटे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com