मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला पालकमंत्र्यांची अनुपस्थिती; गटबाजीची चर्चा

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला पालकमंत्र्यांची अनुपस्थिती; गटबाजीची चर्चा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर नाशिक महापालिकेत( NMC ) एकदा नाही तर दोनदा येऊन आढावा घेणारे व लवकरच मुंबईत मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक लावण्याचे आश्वासन देणारे जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse) मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे झालेल्या बैठकीत अनुपस्थित होते. त्यामुळे विविध चर्चांना ऊत आले आहे.

शिंदे गटात आतापासूनच गटबाजी सुरू झाली आहे का? खा. हेमंत गोडसे ( MP Hemant Godse )यांनी पालकमंत्र्यांना बैठकीपासून दूर ठेवले का? अशी चर्चा रंगू लागली आहे. याबाबत पालकमंत्र्यांना संपर्क केल्यावर संपर्क होऊ शकला नाही.

काही दिवसांपूवी बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटाचे नांदगांव मतदारसंघातील आ. सुहास कांदे यांनी आपल्याला पालकमंत्री बैठकीला बोलावत नसल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली होती. यानंतर नाशकात आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री दादा भुसे व आ. कांदे यांच्यातील नाराजी दूर करीत समेट घालून आणल्याची राजकीय चर्चा होती.

दरम्यान शिंदे गटातील या नाराजीवर पडदा पडत नाही तोच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंंदे यांनी नाशिक महापालिकेच्या विविध विषयावर मंत्रालयात मंगळवारी (दि.22) बैठक बोलावली होती. या महत्वाच्या बैठकीला जिल्हयाचे पालकमंत्रीच नव्हते. भुसे यांना या बैठकीचे निमंत्रणच नव्हते का? निमंत्रण होते तर त्यांनी बैठकीकडे पाठ का फिरवली? याबाबत चर्चा सुरु झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com