Friday, April 26, 2024
Homeनाशिकजिल्ह्यात करोनाग्रस्तांची ९ हजारी पार

जिल्ह्यात करोनाग्रस्तांची ९ हजारी पार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक शहर तसेच जिल्ह्यात करोनाचा उद्रेक वाढत चालला असून आज चोवीस तासात जिल्ह्यात ३३९ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यात करोनाग्रस्तांच्या आकड्याने आज ९ हजाराचा आकडा पार केला असून ही एकुण संख्या ९ हजार २१ इतकी झाली आहे. तर एकाच दिवसात जिल्ह्यातून १२२४ नवे संशयित दाखल झाले आहेत. आज शहरासह जिल्ह्यातील १२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकाच दिवसात ३१६ रूग्णांनी करोनावर मात केली आहे.

- Advertisement -

आज रात्रीपर्यंत जिल्हा प्रशासनास प्राप्त अहावालानुसार आज दिवसभरात एकुण ३३९ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये शहरातील १७० रूग्ण आहेत. यात शहरातील हिरावाडी, कामगारनगर, वाल्मिकनगर , गणेशवाडी, पेठरोड, दिंडोरीनाका , औरंगाबादरोड , तुळजाभवानीनगर , टाकळीरोड , गोरेवाडी, नाशिकरोड, पंचवटी, ंपेठरोड , जुने नाशिक, जेलरोड, इंदिरानगर, गौतमनगर, वडाळारोड, येथील रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे नाशिक शहराचा आकडा ५ हजार २४१ वर पोहचला आहे.

आज ग्रामिण भागातील नाशिक शहरा बरोबरीने १६८ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा २ हजार २४३ झाला आहे. यामध्ये सर्वाधिक ओझर, विल्होळी, उमराळे, इगतपुरी, भगुर, त्र्यंबकेश्वर, घोटी, इगतपुरी, लहवीत, दिंडोरी, नांदगाव, देवळाली कॅम्प येथील रूग्ण आहेत. मालेगामध्ये आज ८ रूग्ण पॉझिटिव्ही आले आहेत. यामुळे मालेगावचा आकडा १ हजार १८९ वर पोहचला आहेे. जिल्हा बाह्य रूग्णांचा आकडा १८५ वर पोहचला आहे. तर करोनामुळे आज दिवसभरात १२ जणांचा मत्यू झाला. यामध्ये सर्वाधिक रूग्ण नाशिक शहरातील आहेत. यामुळे जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा ३८३ झाला आहे.आज दिवसभरात जिल्ह्यातील ३१६ रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा ६ हजार ३९ वर पोहचला आहे.

करोना रूग्ण वाढत असतानाच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडा वाढत चालला असून आज एकाच दिवसात नव्याने १ हजार २२४ संशयित रूग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये नाशिक शहरातील ७४९ आहेत. जिल्हा रूग्णालय १८, ग्रामिण भागातील विक्रमी ३५४, मालेगाव १८, डॉ. वसंतराव पवार रूग्णालय ४ व होम कोरोंटाईन ८५ रूग्णांचा समावेश आहे.

दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यातून ३३ हजार ८८१ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यातील २३ हजार ७८१ निगेटिव्ह आले आहेत. ९ हजार २१ पॉझिटिव्ह आले आहेत. यातील २ हजार ५९९ रूग्ण उपचार घेत आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण कोरोना बाधित: ९०२१

* नाशिक : ५४११

* मालेगाव : ११८९

* उर्वरित जिल्हा : २२४३

* जिल्हा बाह्य ः १८५

* एकूण मृत्यू: ३८३

* करोनामुक्त : ६०३९

- Advertisment -

ताज्या बातम्या