नोव्हे‍ंबरमध्ये बसणार उन्हाचे चटके

देशात सरासरीपेक्षा अधिक तापमानाचा अंदाज
नोव्हे‍ंबरमध्ये बसणार उन्हाचे चटके

मुंबई । वृत्तसंस्था Mumbai

यंदा हिवाळ्यात थंडी ऐवजी उन्हाचे चटके बसणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात ( November Month )देशात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे (Forecast by Meteorological Department). सरासरीपेक्षा तापमान अधिक राहणार असल्यामुळे यंदा महाराष्ट्रात देखील गुलाबी थंडी नसेल. तर उत्तर महाराष्ट्रातील काही भाग सोडता राज्यातील इतर ठिकाणी देखील सरासरीपेक्षा अधिकच किमान तापमान राहण्याची शक्यता आहे.

दर वर्षी ऑक्टोबर महिन्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा बसत असतो. परंतु, यंदा ऑक्टोबर महिन्यात हिट ऐवजी पावसाने धुमाकूळ घातला. महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 70 टक्के अधिक पाऊस पडला आहे. सर्वाधिक मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 104 टक्के पाऊस पडला असून मराठवाड्यात सरासरीपेक्षा 79 टक्के, विदर्भात सरासरीपेक्षा 51 टक्के तर कोकणात 45 टक्के अधिक पाऊस पडला आहे. त्यामुळे यंदा थंडी देखील जास्त कडक पडेल असा अंदाज होता. परंतु, भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार नोव्हेंबर महिन्यात देशात सरासरी ते सरासरीपेक्षा अधित तापमान राहिल. महाराष्ट्रात देखील सरासरीपेक्षा अधिकच किमान तापमान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

ऑक्टोबर हा महिना मुंबईत दर वर्षी उष्णतेच्या बाबतीत अगदी जीवघेणा समजला जातो. आधीच उकाड्याने हैराण होणार्‍या मुंबईकरांना ऑक्टोबर हिट अजून हैराण करत असते. यंदा मात्र मुंबईकरांना हा अनुभव नोव्हेंबर महिन्यात येणार आहे.

नाशिकचा पारा 12.6 अंशावर

नाशिक । गुलाबी थंडीने जिल्ह्यातील तापमान 12.6 अंश सेल्सिअसवर आले आहे. त्यामुळे थंडीचा कडाका वाढत आहे. दाट धुके आणि बदलते हवामान यामुळे तापमान घसरले आहे. आज सकाळी 12.6 अंश सेल्सिअस तापमान होते. कमाल तापमान 28.5 होते. ज्या थंडीची सर्व वाट पाहत होते ती आता सुरु झाली आहे. गोदाकाठी तसेच बहुतांश झोपडपट्ट्यांमध्ये नागरिक शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करतांना दिसत आहेत. रात्री 10नंतर शहरातील प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट पाहावयास मिळत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com