अब्दुल सत्तारांची जीभ पुन्हा घसरली; सुप्रिया सुळेंवर टीका करतांना आक्षेपार्ह भाषेचा वापर

अब्दुल सत्तारांची जीभ पुन्हा घसरली; सुप्रिया सुळेंवर टीका करतांना आक्षेपार्ह भाषेचा वापर

मुंबई | Mumbai

बाळासाहेबांची शिवसेना गटाचे नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची पुन्हा एकदा जीभ घसरली. अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रीया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. त्यांच्या या टीकेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे.

काय म्हणाले अब्दुल सत्तार?

सुप्रिया सुळे यांनी अब्दुल सत्तारांवर टीका करताना म्हटलं होतं की, पन्नास खोके तुम्हाला पण मिळाले आहेत का? यावर सत्तारांनी उत्तर देताना म्हटलं, ते तुम्हाला हवे आहेत का? यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, तुमच्याकडे खोके आले असतील म्हणूनच तुम्ही ते आम्हाला ऑफर करता आहात. सुप्रिया सुळे यांच्या या विधानावर सत्तार भडकले आणि त्यांचं आपल्या बोलण्यावरील नियंत्रण सुटलं अन् ते म्हणाले, इतकी भिकार....झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यांनाही देऊ. असं उत्तर सत्तारांनी दिलं.

वापरलेले शब्द २४ तासांत परत घ्या, नाहीतर...

या प्रकरणी राष्ट्रवादी काँगेस आक्रमक झाली आहे. सुप्रिया सुळेंबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल आमदार अमोल मिटकरींनी टीका करत इशारा दिलाय. 'अब्दुल सत्तार आम्ही तुम्हाला मोठे अलंकार देऊन बोलु शकतो. मात्र आमच्या पक्षाची ती संस्कृती नाही. सुप्रिया सुळेंबद्दल वापरलेले अपःशब्द 24 तासांच्या आत दिलगिरी व्यक्त करून परत घ्या, नाहीतर तुम्हाला महाराष्ट्रात फिरणं अवघड होईल', असं अमोल मिटकरींनी ट्विट करून म्हटलंय.

दरम्यान, याआधीही अब्दुल सत्तार अनेकदा वादग्रस्त वक्तव्याने वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्याचे खासगी सचिव खतगावकर यांना शिवीगाळ केल्याची माहिती होती. तर, जिल्हाधिकाऱ्यांनाही आक्षेपार्ह प्रश्न विचारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामुळे राजकीय वर्तुळात वादंग निर्माण झाले होते. तर, शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हेही अनेकदा वादात सापडले आहेत. केवळ तीन महिनेच झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारला त्यांचे मंत्री अडचणीत आणत असल्याने मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com