पेपर देण्यासाठी गेलेल्या विद्यार्थीनीचे अपहरण

पेपर देण्यासाठी गेलेल्या विद्यार्थीनीचे अपहरण

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरातील बेंडाळे महाविद्यालयात पेपर देण्यासाठी 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी (girl student) घरुन निघाली, हॉटेल कस्तुरी येथून रिक्षात बसली, मात्र त्यानंतर घरी परतली नाही, या अल्पवयीन मुलीचे अपहरण (Abduction) झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील एमआयडीसीतील एका भागात अल्पवयीन मुलगी कुटुंबासह वास्तव्यास असून ती शहरातील महिला महाविद्यालयात 11 वीला शिक्षण घेत आहे. शुक्रवारी तिचा पेपर असल्याने पेपर देण्यासाठी मुलगी घरातून बाहेर पडली, तिला कुटुंबियांनी हॉटेल कस्तूरी येथून रिक्षात बसविले, त्यानंतर उशीरापर्यंत मुलगी घरी आली नाही, सर्वत्र शोध घेवूनही ती मिळून आली नाही.

अखेर तिला कुणीतरी काहीतरी आमिष दाखूवन फूस लावून पळवून नेत तिचे अपहरण केल्याची खात्री झाल्यावर मुलीच्या वडीलांनी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली, या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक दिपक जगदाळे हे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com