नाशिक । प्रतिनिधी

छत्रपती सेनेतर्फे शिवजन्मोत्सव 2021 साठी तयार करण्यात आलेल्या विश्वविक्रमी टाकचा अनावरण सोहळा सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे पार पडला.टाकचे अनावरण शाळकरी मुलीच्या हस्ते करण्यात आले .

गेल्या दोन महिन्यापासून काम सुरू असलेल्या या टाकसाठी तांबे व पितळ याचा वापर करण्यात आला आहे. या टाकचे वजन 70 किलो असून शिवराय मनामनात, शिवराय घराघरात या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या टाकची नोंद वंडर बुक ऑफ रेकॉर्ड (लंडन) येथे झाली आहे ,

छत्रपती सेनेतर्फे विश्वविक्रमचे सलग तिसरे वर्ष असून 2019 मध्ये जिरेटोप , 2020 मध्ये भवानी तलवार आणि 2021 मध्ये टाक साकारण्यात आला आहे. सदर टाक हा शुभरुषी ज्वेलर्सचे ऋषिकेश कपिलें व मूर्तिकार विश्वनाथ संगमनेरकर बंधू यांच्या तर्फे तयार करण्यात आला आहे. या प्रसंगी चेतन राजापूरकर , वंडर बुक ऑफ रेकॉर्डच्या अधिकारी एमी चढ्ढा उपस्थित होते.

सदर टाक साकारण्यात छत्रपती सेनेचे संस्थापक अध्यक्ष चेतन शेलार, कार्याध्यक्ष निलेश शेलार ,कोर टीम अध्यक्ष तुषार गवळी ,उपाध्यक्ष राजेश पवार, संदीप निगळ ,डॉ.शाम थविल, डॉ. जितेश पाटील ,किशोर तिडके , जितेंद्र आहेर ,धीरज खोळंबे ,अविनाश पाटील ,डॉ. विशाल गवळी , ऍड राजेंद्र ठाकरे ,गणेश पाटील ,वैभव कासार ,पंकज येप्रे परीक्षित येप्रे , डॉ. जयंद्र थविल, सागर जाधव , ऋषिकेश गरुड , राज गुंजाळ ,श्याम देशमुख मनीष बोरस्ते , चेतन पाटील, क्षितिज मोरडे ,नकुल तिवारी, शुभम येप्रे , महिला जिल्हा संपर्क प्रमुख ऍड. विद्या चव्हाण , छत्रपती महिला आघाडी प्रमुख पूजा खरे , धनश्री वाघ ,ऋतुजा काकडे , राधिका गवळी, डॉ. सोनाली गवळी ,प्रिया कुमावत, निशा शेलार ,हेमा शेलार , ललिता शेलार यांचे सहकार्य लाभले.