पाच राज्यांचा ओपिनियन पोल : आपची मुसंडी, भाजप, काँग्रेसचे काय?

पाच राज्यांचा ओपिनियन पोल : आपची मुसंडी, भाजप, काँग्रेसचे काय?

पाच राज्यांतील निवडणुकपुर्वी ओपिनियन पोल जाहीर झाले आहे. टाइम्स नाऊ नवभारतने घेतलेल्या या ओपिनियन पोलमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचा आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) दिल्लीबाहेर अनेक राज्यांत जोरदार मुसंडी मारणार आहे.

टाइम्स नाऊ नवभारतच्या गोवा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पंजाब आणि मणिपूर या 5 राज्यांचा ओपिनियन पोल (opinion poll) काढण्यात आला. त्यानुसार पंजाबमध्ये (Punjab) आम आदमी पक्ष बहुमताच्या जवळ असणार आहे. पंजाबमधील 117 जागांपैकी आम आदमी पक्ष 53 ते 57 जागा जिंकू शकतो. गोवा आणि उत्तराखंडमध्येही (Uttarakhand) हा पक्ष जोरदार मुसंडी मारणार आहे. काँग्रेसला (Congress) केवळ 41 ते 45 जागा तर अकाली आघाडीला 14 ते 17 जागा मिळू शकतात. तर, भाजप-कॅप्टन अमरिंदर सिंह (Amarinder Singh) यांच्या युतीला केवळ 1 ते 3 जागांवर समाधान मानावं लागेल.

उत्तराखंडमध्ये पुन्हा भाजप

उत्तराखंडबद्दल बोलायचं झालं तर, या निवडणुकीत भाजपचा (BJP) झेंडा फडकणार आहे. राज्यातील 70 पैकी 42 ते 48 जागा जिंकून भाजपला सहज बहुमत मिळू शकतं, तर काँग्रेसला केवळ 12 ते 16 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, आम आदमी पक्ष इथंही 4 ते 7 जागा जिंकू शकतो.

पाच राज्यांचा ओपिनियन पोल : आपची मुसंडी, भाजप, काँग्रेसचे काय?
कोरोनाच्या सुपर स्प्रेडर विवाहातील नवरीही पॉझिटिव्ह, अनेक मोठ्या नेत्यांना लागण

गोव्यात भाजपाची शक्यता

गोव्यात (Goa)40 जागांच्या राज्यात भाजप 18 ते 22 जागा जिंकू शकतो. तर दुसरीकडं आम आदमी पक्षाला 7 ते 11 जागा मिळण्याची शक्यता आहे. 2017 मध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेल्या काँग्रेसला केवळ 4 ते 6 जागा मिळू शकतात.

उत्तर प्रदेशात पुन्हा भाजप

उत्तर प्रदेशात पुन्हा भाजपचे सरकार येण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे. 1985 नंतर राज्यात सलग दुसऱ्यांदा एखादा पक्ष सरकार बनवण्याच्या परिस्थितीत असणार आहे. उत्तर प्रदेशात भाजपला 230 ते 249 जागा मिळण्याची शक्यता असून काँग्रेस पुन्हा एकेरी आकड्यावर असणार आहे. समाजवादी पक्षाच्या कामगिरीत सुधारणा होणार असून त्यास 137 ते 152 जागा मिळण्याची शक्यता आहे.

पाच राज्यांचा ओपिनियन पोल : आपची मुसंडी, भाजप, काँग्रेसचे काय?
गौतमच्या गोड बातमीनंतर काजलने शेअर केले ग्लॅमरस फोटो

Related Stories

No stories found.