दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना ईडीकडून अटक

jalgaon-digital
1 Min Read

नवी दिल्ली । New Delhi

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ‘आआपा’चे दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन (Health Minister Satyendra Jain) यांना अंमलबजावणी संचालनालयाने (Directorate of Enforcement) आज अटक (Arrested) केली़ आहे…

सत्येंद्र जैन (Satyendra Jain) यांनी हवालामार्फत पैसा मागवला होता, त्या पैशांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला असून याच प्रकरणात त्यांना अंमलबजावणी संचालनालयाने (Directorate of Enforcement) अटक केली आहे.

सत्येंद्र जैन आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित कंपन्यांच्या ४ कोटी ८१ लाख रुपयांच्या मालमत्तांवर (Properties) ईडीने एप्रिलमध्ये टाच आणत आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी कारवाई केली होती़.

तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार, सीबीआयने २०१७ मध्ये दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने या प्रकरणाचा तपास केला़ होता. तर दुसरीकडे जैन यांच्या अटकेमुळे दिल्लीतील ‘आआपा’ ( Aam Aadmi Party) सरकारला मोठा धक्का बसला आहे. जैन यांच्याकडे केजरीवाल सरकारमध्ये आरोग्य खात्याबरोबरच उद्योग, ऊर्जा, नगरविकास आणि पाणीपुरवठा ही खाती आहेत.

दरम्यान, यावर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Deputy CM Manish Sisodia) यांनी प्रतिक्रिया दिली असून आठ वर्षांपूर्वीच्या खोटय़ा गुन्ह्यात जैन यांना अटक करण्यात आल्याचा आरोप करत भाजपला (BJP) लक्ष्य केल़े आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *