मनीष सिसोदियांच्या अटकेविरोधात मुंबईत AAP आक्रमक

मनीष सिसोदियांच्या अटकेविरोधात मुंबईत AAP आक्रमक

मुंबई | Mumbai

दिल्लीचे उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister of Delhi) तथा शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांना (Manish Sisodia) मद्य धोरणप्रकरणी (Liquor) ) दि. २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सीबीआयकडून अटक  करण्यात आली.

चौकशीसाठी मनीष सिसोदिया यांना २७ फेब्रवारी रोजी सकाळी सीबीआय ने दिल्ली कार्यालयात बोलाविले होते, चौकाशीआधी सिसोदिया यांनी सकाळी दिल्लीतील महात्मा गांधी यांचे स्मारक असलेल्या राजघाटावर (Rajghat) जाऊन अभिवादन केले होते.

मनीष सिसोदियांच्या अटकेविरोधात मुंबईत AAP आक्रमक
अग्निपथ योजनेबाबत सर्व याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळल्या; केंद्र सरकारला मोठा दिलासा

सुमारे आठ तासाहून अधिक काळ चौकशी झाल्यानंतर सायंकाळी सीबीआयने त्यांना अटक केली. यांनतर दिल्लीसहित देशभरातील राजकीय वर्तुळात चर्चा पसरली. या अटकेनंतर आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला असल्याने पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत सीबीआय (CBI) च्या या कारवाईचा निषेध नोंदवायला सुरुवात केली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

मनीष सिसोदियांच्या अटकेविरोधात मुंबईत AAP आक्रमक
Summer Season : राज्यात उन्हाळ्याची चाहूल, जाणून घ्या प्रमुख शहरांचे तापमान

या अटकेचा निषेध म्हणून मुंबईतील आम आदमी (Aam Aadmi Party) पक्षाच्या कार्यकार्त्यांनी रस्त्यावर उतरत केंद्र सरकारविरोधात (Central Government) जोरदार घोषणाबाजी केली. नाशिकमध्येही आम आदमी पक्षाच्या कार्यकार्त्यांनी मनीष सिसोदिया यांच्या अटकेविरोधात निदर्शने करत निषेध नोंदविला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com