दिल्लीच्या महापौरपदी आम आदमी पक्षाच्या ओबेरॉय

दिल्लीच्या महापौरपदी आम आदमी पक्षाच्या ओबेरॉय

नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi

दिल्ली महापौर पदासाठी काल अखेर निवडणूक पार पडली. या निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या उमेदवार शैली ओबेरॉय विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजपा उमेदवार रेखा गुप्ता यांचा 34 मतांनी पराभव केला. शैली ओबेरॉय या पटेल नगर विधानसभेच्या वॉर्ड क्रमांक 86 च्या नगरसेविका आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

आपचे उपमहापौरपदाचे उमेदवार आले मोहम्मद इक्बाल यांना 147 मते मिळाली. तर भाजपच्या उमेदवार कमल बागडी यांना 116 मते मिळाली. एकूण 265 मतांपैकी 2 मते अवैध ठरली. परंतू महापौर निवडणुकीत आपच्या शेली ओबेरॉय जिंकल्या आहेत. त्यांना 150 मते मिळाली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com