Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यातीन दिवसातच 'आप'ला धक्का; एक आमदार भाजपच्या वाटेवर

तीन दिवसातच ‘आप’ला धक्का; एक आमदार भाजपच्या वाटेवर

नवी दिल्ली | New Delhi

भाजपने गुजरात विधानसभा निवडणुकीत (Gujarat Assembly Elections) आम आदमी पक्षाची धूळधाण उडवल्यानंतर पुन्हा एकदा आम आदमी पक्षाला (Aam Aadmi Party) मोठा धक्का दिला आहे. गुजरातमध्ये सरकार स्थापन होण्यापूर्वीच ‘आप’चा एक आमदार भाजपच्या (BJP) वाटेवर असल्याचे बोलले जात आहे…

- Advertisement -

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला १५६, काँग्रेसला १७ आणि आपला ५ जागांवर यश मिळाले असून विसवादर मतदारसंघातील आपचे आमदार भूपत भायानी (MLA Bhupat Bhayani) गांधीनगरमध्ये भाजपात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.तर दुसरीकडे तीन अपक्ष आमदारांनीही (MLA) भाजपला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला आहे. त्यात बायडमधून धवल झाला, धानेरामधून मावजी देसाई आणि वाघोडियामधून निवडून आलेले धर्मेंद्र वाघेला यांचा समावेश आहे.

दरम्यान, विसवादर मतदारसंघाच्या (Viswadar Constituency) जागेवर भाजपने काँग्रेसमधून (Congress) आलेल्या हर्षद रिबाडिया यांना उमेदवारी दिली होती. तर काँग्रेसने करशन वडोदरिया यांना उमेदवारी दिली होती. त्यामळे भूपत भायानी यांचा सामना थेट हर्षद रिबाडिया (Harshad Ribadia) यांच्यासोबत होता.ही निवडणूक भूपत भायानी यांनी ६९०४ मतांनी जिंकली असून भायानी यांना ६५६५७ तर हर्षद रिबाडिया यांना ५८७७१ मते मिळाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या