Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याAditya Thackeray : जालना घटनेचा खरा जनरल डायर कोण?; आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यावर...

Aditya Thackeray : जालना घटनेचा खरा जनरल डायर कोण?; आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यावर निशाणा

मुंबई | Mumbai

मराठा आरक्षणासाठी जालन्यातील (Jalna) अंतरवाली सराटी (Antarwali Sarathi) गावात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मागील नऊ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. मात्र शांततेत सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांकडून अमानुष लाठीचार्ज करण्यात आला. याचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहे. याचदरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावरुन आज राज्यपालांची भेट घेतली. रमेश बैस यांच्या भेटीनंतर आमदार आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर घणाघात केला.

- Advertisement -

जालन्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम घ्यायचा म्हणून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. पोलीस अशा आंदोलनात लाठीचार्ज करत नाहीत. त्यामुळे जालना घटनेचा खरा जनरल डायर कोण?, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर निशाणा साधला. लाठीचार्ज झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि इतर नेते जालन्यामध्ये पोहोचले होते. लाठीचार्ज करण्याची आवश्यकता नसते. अशा महत्त्वाच्या विषयात पोलिस विचारल्याशिवाय लाठीचार्जचा निर्णय घेऊ शकत नाहीत. आम्हीही सरकारमध्ये राहिलोय. त्यामुळे मी तुम्हाला याची खात्री देऊ शकतो. अशा प्रकरणात मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडून आदेश दिले जातात, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणतात आम्ही आदेश दिले नाहीत, मग सरकार कसं चालू आहे. मुख्यमंत्र्यांना समन्स द्यावी यासाठी आम्ही राज्यपालांची भेट घेतली. अनागोंदी सरकार सुरु आहे. गद्दार, घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये खरे जनरल डायर होण? ज्यांनी लाठीचार्जचे आदेश दिले. त्यांची नावे लोकांसमोर येणे गरजेचे आहे, असं ते म्हणाले. याप्रकरणात काय होईल हे मी आत्ताच सांगतो. समिती बसवली गेली आहे, रिपोर्ट आल्यानंतर एखाद्या आयएएस किंवा आयपीएस अधिकाऱ्याचे निलंबन केले जाईल. त्यामुळे ज्याने लाठीचार्जचे आदेश दिले त्याला काहीही होणार नाही, हे दुर्दैव आहे. राज्यपालांना यासाठीच आम्ही भेटलो. यावर कारवाई होईल अशी अपेक्षा. मुख्यमंत्र्यांनी थोडी लाच उरली असेल तर राजीनामा द्यावा, असं आदित्य म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या