Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशदिशा सालियान मृत्यू प्रकरण : सुशांतसिंह राजपूतचे वडील म्हणाले, आदित्य ठाकरेंची नार्को...

दिशा सालियान मृत्यू प्रकरण : सुशांतसिंह राजपूतचे वडील म्हणाले, आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट व्हायला हवी

दिल्ली | Delhi

दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी होणार आहे. राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषणा केली आहे.

- Advertisement -

दरम्यान दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या वडिलांनी या प्रकरणात उडी घेतली आहे. या प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवरही गंभीर आरोप केला आहे.

सुशांतचे वडील के. के. सिंह म्हणाले, जसं मी बातम्यांमध्ये पाहिलं की दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेचं नाव येत आहे. खरं कारण एसआयटीच्या चौकशीतूनच समोर येईल. आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट व्हायला हवी.

तसेच, हे यापूर्वीच व्हायला हवं होतं, परंतू त्यावेळी सरकार दुसरं होतं त्यामुळं हे होऊ शकलं नाही. आत्ताच्या सरकारनं घेतलेला निर्णय योग्य आहे. गेल्या सरकारमध्ये चौकशी योग्य प्रकारे यामुळं झाली नाही कारण या प्रकरणात तेच लोक यामध्ये सामिल होते. असा आरोप त्यांनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या