आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल,म्हणाले...

आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल,म्हणाले...

मुंबई | Mumbai

वेदांता प्रकरण, वर्सोवा सी-लिंक (Vedanta case, Versova C-Link) आणि सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या टिकेला उत्तर देतांना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (CM Eknath Shinde) टीका केली...

ते म्हणाले की, वर्सोवा बांद्रा सी लिंक (Versova Bandra Sea Link) कामाची कंपनी बदलली गेली. या नवीन कंपनीने जॉब ओपनिंग ठेवले. पंरतु वॉक इन इंटरव्ह्यू ठेवले चेन्नईमध्ये. मग मराठी मुलांना नोकरी कशी मिळणार? राज्यात हजारो इंजिनिअर कामासाठी तयार आहेत मग तिकडे मुलाखती का? हे सगळे मुख्यमंत्र्यांच्या संमतीने सुरू आहे का? मुख्यमंत्र्यांचे हे खाते आहे. त्यांनी यावर उत्तर द्यावे मुंबईत (Mumbai) का मुलाखती घेतल्या जात नाही?, असा सवाल आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.

पुढे ते म्हणाले की, 'वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta Foxconn Project) महाराष्ट्रातून (Maharashtra) गुजरातला (Gujrat)नेला, यावर अजूनही सरकारकडून उत्तर आलेले नाही. बल्क ड्रग पार्कातही (Bulk Drug Park) ७० ते ८० हजार नोकऱ्या निर्माण झाल्या असत्या असे म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde Fadnavis government) निशाणा साधला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com