Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याआदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, कांजूरमार्गची...

आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, कांजूरमार्गची…

मुंबई | Mumbai

माजी पर्यावरणमंत्री आणि ठाकरे गटाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी कांजूरमार्गच्या जागेवरून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) गंभीर आरोप केले आहेत.

- Advertisement -

शहरासह जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह तुफान अवकाळी पाऊस

कांजूरमार्ग येथील ४४ हेक्टरमधील १५ हेक्टर जागा मेट्रो-६ कारशेडसाठी दिली जाणार आहे. मग, उरलेली जागा बिल्डरांच्या घशात घालण्यासाठी ठेवली का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला विचारला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे

मी बेईमान..तर जगात कोणीही प्रामाणिक नाही; केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

यावेळी ते म्हणाले की, महसूल खात्याने कलेक्टरला सांगितले आहे की, मेट्रो ६ साठी आपण कांजूरमार्गच्या जागेपैकी १५ हेक्टर जागा एमएमआरडीएला हस्तांतरीत करावी, आजची ही बातमी मुंबईच्या दृष्टीकोनातून मोठी आहे. यातून एकच सिद्ध होतं की, आम्ही गेल्या अडीच तीन वर्षे जे बोलत आलो आहोत की, मेट्रो ६ साठी कांजूरमार्गची कारशेड गरजेची आहे.

दुर्दैवी! सात महिन्याच्या चिमुकलीसह आईचा धरणात बुडून मृत्यू

पुढे ते म्हणाले की, या कारशेडसाठी २०१८ मध्ये टेंडर काढले होते, पण कारशेड बनवणार कुठे हा प्रश्नच होता. पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कांजूरमार्गच्या ४४ हेक्टरच्या कारशेडमध्ये लाईन ३, लाईन ६, लाईन १४ आणि लाईन ४ या चार लाईन्सचे कारडेपो आपण एकत्र करणार होतो. यामागे जनतेचे, महाराष्ट्राचे पेसै आणि वेळ वाचावा हाच हेतू होता, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

मोदी सरकारच्या चुकीमुळेच पुलवामा हल्ला; जम्मू-काश्मीरच्या माजी राज्यपालांचा मोठा गौप्यस्फोट

ते पुढे म्हणाले की, कांजूरमार्ग कारशेड (Kanjurmarg Carshed) झाले असते, तर साडे दहा ते साडे दहा हजार कोटी वाचले असते. त्याठिकाणी इंटिग्रेटेड कारशेड झाले असते. आम्ही आरे कारशेडमधील ८०० एकर परिसर जंगल म्हणून घोषित केले. मुंबईकरांना इंटिग्रेटेड कारशेडपासून वंचित ठेवले. आता सुप्रीम कोर्टातील केस माघार घेण्यात आली आहे. त्यामुळे ४४ हेक्टरपैकी १५ हेक्टर जमीन कोणाच्या मालकीची आहे? संबंधितांना भरपाई देणार आहेत की नाही? अशी विचारणा यावेळी आदित्य ठाकरेंनी केली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या