Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याआदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला; म्हणाले, ५० खोके वाले आज...

आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला; म्हणाले, ५० खोके वाले आज…

मुंबई | Mumbai

कर्नाटकमध्ये १० मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांकडून प्रचारसभा घेण्यात आहेत. महाराष्ट्रातूनही काँग्रेस आणि भाजपाचे स्टार प्रचारक कर्नाटकात तळ ठोकून आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सुद्धा आज भाजपाच्या प्रचारासाठी कर्नाटकमध्ये दाखल झाले आहेत. यावरुन ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

…अन् शरद पवारांनी केला मणिपूरच्या राज्यपालांना फोन

“५० खोके वाले आज ४० टक्क्यांसाठी कर्नाटकमध्ये भाजपाच्या प्रचाराला गेले आहेत. खरं तर तिथे जाऊन त्यांनी सीमा भागातील मराठी बांधवांशी संवाद साधायला हवा होता, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठिशी त्यांनी उभं राहायला हवं होतं. मात्र, मिंधे ते मिधेंच. केवळ स्वत:ची खुर्ची वाचवण्यासाठी ते आपल्या बॉसचं ऐकून भाजपाच्या प्रचारासाठी गेले”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

कर्नाटकमध्ये कोणाचं सरकार येणार? शरद पवार म्हणाले….

दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये मतभेद असून यापुढे त्यांची वज्रमूठ सभा होणार नाही, अशी टीका भाजपा शिंदे गटाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. यावरही आदित्य ठाकरे यांनी भाष्य केले असून “विरोधकांना वज्रमूठ सभेचा धक्का बसला आहे. त्यामुळे ही सभा होऊ नये, अशी त्यांची इच्छा आहे. मात्र, खारघर सारखी घटना पुन्हा घडू नये म्हणून वज्रमूठ सभा उन्हाळ्यानंतर घेण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याची” प्रतिक्रिया त्यांनी दिली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या