Saturday, May 11, 2024
Homeमुख्य बातम्या... तर आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार; आदित्य ठाकरेंचे शिंदे गटाला आव्हान

… तर आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार; आदित्य ठाकरेंचे शिंदे गटाला आव्हान

मुंबई | Mumbai

सध्या राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Monsoon session) सुरु असून शिवसेनेतील (Shivsena)बंडखोरीनंतर सत्तेत आलेला शिंदे गट आणि महाविकास आघाडी (Shinde group and Mahavikas Aghadi) आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहे…

- Advertisement -

अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरू आहे. त्यासोबतच विधानभवनात पायऱ्यांवर दिल्या जाणाऱ्या घोषणा हा चर्चेचा विषय ठरला आहे.

गेले काही दिवस ५० खोकेच्या घोषणा चालल्यानंतर आज सत्ताधाऱ्यांनी थेट शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (MLA Aditya Thackeray) यांना लक्ष्य केले आहे. “महाराष्ट्राचे प पू…,” ‘युवराजांची ‘दिशा’ चुकली’ अशा आशयाचे बॅनर्स गळ्यात घालून शिंदे गटाच्या आमदारांनी पायऱ्यांवर उभे राहात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर आदित्य ठाकरेंनी शिंदे गटातील आमदारांना जाहीर आव्हान दिले आहे.

यावेळी ठाकरे म्हणाले की, मी आमदारकीचा (MLA) राजीनामा देण्यास तयार आहे. पण आधी ४० आमदारांनी राजीनामा द्यावा, अशी अट त्यांनी ठेवली आहे. तसेच तुम्ही राजीनामा द्या, मीही देतो. सर्व मिळून निवडणुका लढू. जनतेच्या दरबारातच दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ द्या, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले की, एका मंत्रिपदासाठी गद्दांरांना काय काय करावे लागते. गद्दारांची मला कीव येते, अशी टीका करताना शिवसेनेला आता चांगला प्रतिसाद मिळत आहे. येणाऱ्या काळात शिवेसना पुन्हा उभारी घेईल, असेही ठाकरे यांनी सांगितले.

तसेच शिंदे गटाचे आमदार (Shinde group MLA) दिलेल्या स्क्रिप्टनुसार बोलत आहेत. त्यांच्यातील अनेकांना दिल्लीपर्यंत जावे लागत आहे. आता तर गल्लीतील लहान लहान मुलांनाही ५० खोके माहीत झाले आहेत. या मंत्र्यांचा काहीच अभ्यास नाही. ते सभागृहात उघडे पडत आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच ही अट ठेवल्याने आता शिंदे गट त्याला कसे उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ४० वर्षात आम्ही गद्दारांना खूप काही दिले. आमच्याच पाठीत गद्दारांनी खंजीर खुपसला. आम्हाला शिव्या द्या. मंत्रीपद मिळतील आमदारांना असे त्यांना सांगण्यात आले. आजही ते स्वत:च विचार करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या