गिरणेत तरूणाची उडी; मात्र सापडला दुसर्‍याचाच मृतदेह

गिरणेत तरूणाची उडी; मात्र सापडला दुसर्‍याचाच मृतदेह

लोहणेर । वार्ताहर | Lohner

पुलावरून गिरणा नदीपात्रात (girna river) सटाणा (satana) येथील युवकाने उडी मारल्याने त्यास शोधण्यासाठी देवळा पोलीस (Devla Police) व स्थानिक पोहणार्‍या तरूणांतर्फे शोध मोहिम (search mission) हाती घेण्यात आली.

मात्र दुसर्‍याच इसमाचा मृतदेह (dead body) सापडल्याने शोधायला गेले एकास सापडला दुसराच असा प्रकार घडल्याने पोलिसांसह ग्रामस्थ चिंताक्रांत झाले. सापडलेला मृतदेह कुणाचा? याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान देवळा पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. काल रात्री साडेसात वाजेच्या सुमारास गिरणा पुलावरून (girna bridge) युवकाने नदीपात्रात घेत आत्महत्या (suicide) केली.

सदर युवक सटाणा (satana) येथील रोशन गोकुळ कुमावत (21) हा असल्याचे बोलले जात होते. रात्र असल्याने आज सकाळी देवळा पोलिसांनी स्थानिक पोहणार्‍या तरूणांच्या मदतीने रोशनच्या शोधासाठी नदीपात्रात शोध मोहिम सुरू केली होती. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास एक मृतदेह (dead body) हाती लागल्याने ओळख पटविण्यासाठी रोशनच्या कुटूंबियांना घटनास्थळी पाचारण केले गेले.

सदरचा मृतदेह रोशनचा नसल्याचे कुटूंबियांनी सांगितले. त्यामुळे सापडलेला हा मृतदेह (dead body) नेमका कुणाचा याबाबत पोलिसांसमोर प्रश्न उभा राहिला आहे. पोलिसांनी याप्रकरणी बेवारस म्हणून नोंद केली असून मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन देवळा पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. नदीपात्रात उडी घेणार्‍या रोशन कुमावतचा सायंकाळपर्यंत शोध घेण्यात येत होता. मात्र त्यास यश शकले नाही.

पुलावरून गिरणा नदीपात्रात (girna river) उडी घेत आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. बांधकाम विभागाने पुलाच्या दोन्ही बाजूस सुमारे दहा फूट उंची व लांबीची संरक्षण जाळी बसविल्यास हे प्रकार टळतील, अशी मागणी यशवंत पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com