पुलावरून दुचाकीसह युवक पडला नदीपात्रात; संरक्षक जाळ्या बसविण्याची मागणी

युवकाला वाचवण्यात यश
पुलावरून दुचाकीसह युवक पडला नदीपात्रात; संरक्षक जाळ्या बसविण्याची मागणी

देवळाली कॅम्प।वर्ताहर Deolali Camp

संसरी ते शेवगे दारणा दरम्यानच्या दारणा नदीवरील पुलावर ( Bridge on Darna River )सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास धनंजय हनुमंत कासार(वय ४२) हा युवक आपल्या मोटरसायकल ने जात असताना मोटरसायकल घसरून संरक्षण जाळ्या नसलेल्या पुलावरून 50 फूट खाली कोसळला मात्र फुलावर उपस्थित असलेल्या तिघा नागरिकांनी ताबडतोब नदीपात्रात झेप घेत या युवकाला वाचवण्यात यश मिळवले

दारणा नदीपात्रात शेवगे दारणा येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या पुलाचे कथडे अनेक ठिकाणी तुटले आहेत, तसेच पुलावरील कठडे तुटलेल्या स्थतीत असल्याने व पुलावरील भाग पावसामुळे निसरडा झाला आहे .

सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास धनंजय हनुमंत कासार हे आपल्या मोटरसायकल द्वारे संसरी वरून शेवगे दारणाकडे येत असताना मोटरसायकल चिखलामुळे स्लिप झाली, पुलाला कठडा नसल्यामुळे सदर युवक मोटरसायकल सह 50 फूट खाली नदी पात्रात कोसळला, ही घटना समोर पुलावर उपस्थित असलेल्या सुरेश हरिभाऊ कासार, चंद्रकांत गजराम कासार, दिलीप त्र्यंबक उर्फ डॉक्टर कासार यांनी बघितली, त्यांनी क्षणाचा विलंब न करता तातडीने नदीपात्रात झेप घेत वाहून जाणाऱ्या धनंजय चा पाठलाग केला.

पुलापासून शंभर मीटर अंतरावर त्याला गाठण्यात त्यांना यश आले व तिघांनी धनंजय यास नदी पात्रा बाहेर काढले मोटरसायकल मात्र पाण्यात बुडाली. घटनेची माहिती मिळतात नागरिकांनी पुलावर धाव घेतली बाहेर काढलेल्या युवकाला रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले, या ठिकाणी फुलाचा वरील भाग अतिशय खराब व निसरडा झालेला असून त्याची डाकडजी करणे गरजेचे आहे तसेच पुलाच्या दोन्ही बाजूचे कथडे हे पूर्णपणे बंदिस्त करून संरक्षण जाळ्या बसवण्यात याव्यात अशी मागणी माजी सरपंच राजाराम कासार, बाळासाहेब कासार, दशरथ पाळदे, प्रकाश पाळदे, गजीराम कासार, समाधान कासार,चंद्रकांत पाळदे,नारायण पाळदे,रमेश पाळदे आदींनी केली आहे.

पूल धोकादायक

शेवगे दारणा येथील पूल हा अत्यंत धोकादायक बनला असून या पूलाचे कथडे पुरामुळे वाहून गेले आहेत, सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, या पूलावरून शालेय विद्यार्थ्यांची अनेक वाहने सकाळ सायंकाळी धावत असतात,अनेक विद्यार्थी सायकल ने ये जा करतात, काल परवाच्या पावसात सदरची घटना घडली असती तर मोठी दुर्घटना घडली असती, संबंधित विभागाने तातडीने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे

-शरद कासार भाजप नाशिक लोकसभा समन्वयक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com