निमड्या येथे तरुणाचा दगडाने ठेचून खून

निमड्या येथे तरुणाचा  दगडाने ठेचून खून

पाल pal ता.रावेर (वार्ताहर)

पाल परिसरातील सातपुडा पर्वताच्या दुर्गम भागातील निमड्या (Nimdya) येथे ३० वर्षीय तरुणाचा (young man) दगडाने ठेचून (stoned) खून (death) झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.याबाबत रावेर पोलिसांत अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

 येथील संजय रेमसिंग पावरा (वय-३०) हे मयत तरुणाचे नाव आहे.सदरील तरुण शुक्रवारी रात्री जेवण करून घराबाहेर  पडला,परंतु  उशिरापर्यंत घरी परत न आल्याने त्याचा शोध घेण्यासाठी वडील रेमसींग पावरा व लहान भाऊ मुकाराम गेले असता,सकाळी ७ वा.स्त्याच्या बाजूला त्याची दुचाकी लागलेली दिसली.जवळच असलेल्या नाक्याजवळ नाल्यात संजय बारेला मृत अवस्थेत पडलेला आढळून आला.

या घटनेबाबत माजी उपसरपंच इरफान तडवी यांनी पाल पोलीस स्टेशनला माहिती  दिली असता,पो उप.निरीक्षक विशाल सोनवणे,पो हे कॉ अमोकर घटनास्थळी जाऊन घटनेची पाहणी केली.त्या नंतर घटनास्थळी विभागीय पोलिस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे,पो निरीक्षक कैलास नगरे देखील दाखल झाले.

गुन्ह्याचा तपास लावण्यासाठी श्वानपथक देखील बोलवण्यात आले होते.पोलीस याबाबत तपास करत असून काही संशयित देखील ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com