नाशकात चार हजार किलो भगर बनविण्याचा जागतिक विक्रम

नाशकात चार हजार किलो भगर बनविण्याचा जागतिक विक्रम

नाशिक | प्रतिनिधी Nashik

युनेस्कोने २०२३ हे वर्ष मिलेट्स (तृणधान्य) वर्ष म्हणून नुकतेच जाहीर केले आहे. नाशिकची भगर ही भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध आहे. नाशिक भगर मिल असोसिएशन (Nashik Bhagar Mill Association ) व कृषी विभाग( Department of Agriculture) यांच्या पुढाकाराने 'महाराष्ट्र मिलेट्स मिशन '(Maharashtra Milletes Mission )यांच्या सहकार्याने रविवारी (ता. १२) त्र्यंबकरोडवरील ठक्कर इस्टेट येथे चार हजार किलोची भगर शिजवून ती नाशिककरांना मोफत वाटप करण्यात आली. आंतरराष्ट्रीय प्रख्यात शेफ विष्णू मनोहर ( Renowned Chef Vishnu Manohar)यांनी ही भगर बनविली आणि त्यांच्या नावे १६ जागतिक विक्रमही नोंद झाले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरण्‌ डी., मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आमदार दिलीप बनकर, माजी आमदार अनिल कदम, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी प्रत्यक्ष भगर बनविण्याचा आनंद घेतला. नाशिक भगर मिल असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र छोरिया, उमेश वैश्‍य, अशोक साखला, पारस साखला, पियुष बोरा, अखिल राठी, दिपक राठी, मोहनलाल चोरडिया यांनी सदरचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

अशी होती भगरची खास रेसिपी

भगर बनविण्यासाठी विष्णू मनोहर यांनी खास रेसिपी तयार केली असून, त्यासाठी भगर ४०० किलो, बटाटा २५० किलो, मीठ ३७ किलो, तेल १२५ किलो, पाणी २७०० लिटर , जिरा १२ किलो, शेंगदाणे १०० किलो, शेंगदाणे कूट १२५ किलो, दही ४०० किलो, ५०किलो, तूप १०० किलो, दूध १०० लिटर आदी साहित्य वापरून ४ हजार किलो भगर शिजविण्यात आली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com