
मुंबई | Mumbai
दोन दिवसांपूर्वी मुंबईतील मालाड परिसरात (Malad Area) ५० हून अधिक झोपडपट्ट्यांना आग (Fire) लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा कुर्ल्यातील (Kurla) एका इमारतीला आग लागली असून आगीने रौद्ररुपधारण केल्याने ६ मजले आगीच्या भस्मस्थानी सापडले आहेत...
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास कुर्ल्यातील एका इमारतीला अचानक आग लागली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. इमारतीच्या (Building) चौथ्या मजल्यावर आग लागल्यानंतर ती बघता बघता १० व्या मजल्यापर्यंत पसरली असून या आगीत एका महिलेचा मृत्यू (Death) झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.