एका विषाणूने जगाला चिंतेत टाकले, एक कोटी मृत्यू होण्याची शक्यता

एका विषाणूने जगाला चिंतेत टाकले, एक कोटी मृत्यू होण्याची शक्यता

दोन वर्षामध्ये कोरोना (Corona) विषाणूच्या वेगवेगळ्या व्हेरियंटने कहर माजवला आहे. आता पुन्हा एकदा कोविड संसर्गाची नवी लाट पाहायला मिळत आहे. त्यातच आता आणखी एका विषाणूने (virus) संपूर्ण जगाला चिंतेत टाकले आहे.

काही दिवसांपासून अमेरिकेत वेगाने पसरणाऱ्या सुपरबग जिवाणूमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. मेडिकल जर्नल लॅन्सेटच्या अभ्यासात याबाबत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या सुपरबगचं नाव मायकोप्लासमा जेनिटेलियम (Mycoplasma Genetalium) असे आहे. अमेरिकेत मानवांमध्ये वेगाने पसरणाऱ्या एका सुपरबग विषाणूमुळे धोका वाढला आहे. त्यामुळे नव्या वर्षात सुपरबग कोरोनानंतरचा दुसरा सर्वात मोठा धोका बनणार अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही वर्षांत सुपरबग जिवाणू सुपरबग वैद्यकीय शास्त्रासमोर एक मोठे आव्हान म्हणून समोर आला आहे. अशा परिस्थितीत कोरोना आणि सुपरबगचा संसर्ग अधिक धोकादायक बनत आहे. काही दिवसांपासून अमेरिकेत वेगाने पसरणाऱ्या सुपरबग जिवाणूमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे.लॅन्सेट या मेडिकल जर्नल मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनाच्या अहवालानुसार, सुपरबग जिवाणू याच वेगाने पसरत राहिला तर दरवर्षी एक कोटी लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे.

सुपरबग कसा पसरतो?

त्वचेचा संपर्क, जखमा, लाळ आणि लैंगिक संपर्काद्वारे सुपरबग्स एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरतात. सुपरबग मानवी शरीरात गेल्यावर औषधांचा रुग्णावर परिणाम होणे थांबते. सुपरबग्सवर सध्या कोणतेही औषध उपलब्ध नाही, पण योग्य पद्धतींचा अवलंब केल्यास याचा धोका टाळता येऊ शकते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com