Accident News : जम्मूमध्ये जवानांना घेऊन जाणारी गाडी नदीत कोसळली

Accident News : जम्मूमध्ये जवानांना घेऊन जाणारी गाडी नदीत कोसळली

दिल्ली | Delhi

जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) सीआरपीएफ जवानांच्या वाहनाला मोठा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. सीआरपीएफ (CRPF) जवानांना घेऊन जाणारी एक गाडी सिंध नाल्यात कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यात रविवारी ही घटना घडल्याची माहिती आहे. यात आठ जवान जखमी झाले आहे. सर्व जखमींना बाहेर काढण्यात आलं असून बालटाल बेस कॅम्प रुग्णालयात नेण्यात आलं, अशी माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.

Accident News : जम्मूमध्ये जवानांना घेऊन जाणारी गाडी नदीत कोसळली
सचिन तेंडुलकरांच्या ‘या’ कृत्यावर बच्चू कडूंचा थेट आक्षेप; लिहिलं खुलं पत्र

माहितीनुसार, HR36AB/3110 या नंबरची गाडी CRPF जवानांना घेऊन जात होती. चालकाचे नियंत्रण सुटल्याने सिंध नदीत गाडी कोसळल्याने हा अपघात झाला. ही घटना घडली तेव्हा सीआरपीएफचे जवान बालटाल मार्गे अमरनाथ गुहेकडे जात होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अमरनाथ यात्रा अधिक सुरक्षित करण्यासाठी मोठ्या संख्येने CRPF जवान तैनात करण्यात आले आहेत. सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक आलोक अवस्थी यांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ तास इथे पर्यटकांचा प्रवास असो किंवा नसो आम्ही सेवेसाठी तैनात असतो. पण यात्रेच्या पार्श्वभूमीवर फौजफाट्यांची संख्या वाढवण्यात आली असून अधिक खबरदारी घेण्यात येत आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com