कामगार संघटनांचा देशव्यापी संप

कामगार संघटनांचा देशव्यापी संप

सातपूर । प्रतिनिधी Satpur

केंद्र सरकारच्या कामगार, शेतकरी व राष्ट्रविरोधी धोरणाच्या निषेधार्थ दि.28 व 29 मार्च रोजी नाशिक जिल्हा कामगार संघटना (Nashik District Workers Union ) संयुक्त कृती समितीच्या वतीने दोन दिवसांचा देशव्यापी संप (nationwide strike )पुकारण्यात आला असून जिल्ह्यात मोर्चे, निदर्शने करण्याबरोबरच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती सीटूचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड (State President of CITU Dr. D. L. Karad )यांनी दिली.

सीटू कामगार भवन येथे माहिती देताना डॉ. कराड यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या कामगारविरोधी चार श्रमसंहिता रद्द कराव्यात, खासगीकरण, कंत्राटीकरण, महागाई, बेरोजगारीविरोधात दि.28 व 29 मार्च रोजी देशव्यापी दोन दिवसांचा संप करण्यात येणार आहे.

यावेळी जिल्ह्यात विविध ठिकाणी तालुकास्तरावर मोर्चे निदर्शने, आंदोलन करणार आहेत. तसेच 29 मार्च रोजी सकाळी 11 वाजता गोल्फ क्लब मैदानावर जमून जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.

यावेळी आयटकचे राजू देसले, भारतीय कामगार सेनेचे उत्तम खांडबहाले, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे डॉ. भगवान पाटील, अरुण आहेर, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या सेक्रेटरी सुनंदा जरांडे, वीज कर्मचारी संघटनेचे व्ही. डी. धनवटे, विमा कर्मचारी संघटनेचे मोहन देशपांडे, सीएट टायर युनियनचे अध्यक्ष भिवाजी भावले, सतीश खैरनार, विवेक ढगे, अमोल बोरनारे आदींसह विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

संपात सीटू, आयटक, इंटक, एचएमएसबीकेएस, एनटीयूआय, आयसीसीटीयू, टीयूसीआय, टीडीएफ, एआयबीडए, एआयआयईए, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, केंद्र सरकार कर्मचारी संघटना, सेंट्रल पब्लिक सेक्टर ट्रेड युनियन्स सहभागी होणार आहेत.

Related Stories

No stories found.