
अमळनेर Amalner
येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (Agricultural Produce Market Committee) निवडणुकीसाठी (election) सुमारे १४० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.त्यात ८५ जणांनी माघारीच्या शेवटच्या दिवशी माघार घेतली असून ५३ उमेदवार रिंगणात आहेत.यामुळे बाजार समितीच्या निवडणूक साठी तिरंगी लढत (three-way fight) होणार असून पॅनलला अपक्ष उमेदवारांचे आव्हान राहणार आहे. व्यापारी मतदार संघातील दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर आता प्रत्यक्ष १६ जगासाठी निवडणूक होणार आहे.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माघारीच्या शेवटच्या दिवशी सुमारे ८५ जणांनी माघार घेतली असून ५३ उमेदवार आता रिंगणात उतरले आहेत. त्यात सोसायटी सेवा मतदार संघ , सर्वसाधारण मतदार संघात सात जगासाठी ५८ जणांनी अर्ज दाखल केले होते.त्यात ३२ जणांनी माघार घेतली असून २६ उमेदवार रिंगणात आहेत.
महिला राखीव मतदार संघात ११ जणांनी अर्ज दाखल केले होते.त्यात ५ जणांनी माघार घेतली असून २ जागांसाठी ६ उमेदवार रिंगणात आहेत
इतर मागासवर्गीय मतदार संघात १६ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.त्यात १२ जणांनी माघार घेतली असून एका जागेसाठी ४ जण रिंगणात आहेत.
विजाभज मतदार संघात ७ जणांनी अर्ज दाखल केले होते.त्यापैकी ५ जणांनी माघार घेतली असून एका जागेसाठी २ उमेदवार रिंगणात आहेत.
ग्रामपंचायत मतदार संघ
सर्वसाधारण मतदार संघात २२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.त्यात १७ जणांनी माघार घेतली असून दोन जागांसाठी ५ उमेदवार रिंगणात आहेत.
अनुसूचित जाती-जमाती मतदार संघात ८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.त्यापैकी ४ जणांनी माघार घेतली असून एका जागेसाठी ४ जण रिंगणात आहेत
आर्थिक दुर्बल मतदार संघात ८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.त्यात ५ जणांनी माघार घेतली असून एका जागेसाठी ३ जण रिंगणात आहेत.
हमाल मापाडी मतदार संघात ३ जणांनी अर्ज दाखल केले होते.मात्र यात कोणीही माघार न घेतल्याने एका जागेसाठी ३ जण रिंगणात आहेत.
तर व्यापारी मतदार संघात ७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.त्यात ५ जणांनी माघार घेतली असून उर्वरित दोन उमेदवार हे बिनविरोध निवड झाले आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समिती साठी ५३ उमेदवार रिंगणात आहेत.त्यात महाविकास आघाडी,भारतीय जनता पार्टी व आम आदमी पार्टी चे तीन पॅनल रिंगणात असून त्यांना अपक्ष उमेदवार अनिल शिसोदे , पराग श्याम पाटील नितीन बापू पाटील यांनी आव्हान उभे केलेले आहे