
मुंबई | Mumbai
येथील ओशिवारा (Oshiwara) भागात फर्निचर मार्केटला (Furniture Market) भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून काही क्षणातच आगीने रौद्ररुप धारण केले...
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी पश्चिमेकडील (Jogeshwari West) राम मंदिराजवळ हे फर्निचर मार्केट असून या आगीत अनेक गाळे जळून (Burn)खाक झाले आहेत. तर ही आग नेमकी कशामुळे लागली याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच या घटनेत आतापर्यंत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे (Fire Brigade) आठ बंब घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. तर मुख्य रस्त्यावरच ही आगीची घटना घडल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.