Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक-सिन्नर रस्त्यावर भीषण अपघात; बसने घेतला पेट

नाशिक-सिन्नर रस्त्यावर भीषण अपघात; बसने घेतला पेट

नाशिक | Nashik

नाशिक- सिन्नर रस्त्यावरील (Nashik- Sinnar Road) शिंदे पळसे टोल नाक्याजवळ (Toll Plaza) दोन एसटी बस, १ चारचाकी आणि ३ दुचाकी असा एकूण ६ वाहनांचा भीषण अपघात (Accident) घडला आहे…

- Advertisement -

नाशिक-सिन्नर महामार्गावरील बस अपघाताचे CCTV Footage आले समोर

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पळसे गावाजवळ (Palase village) हा अपघात घडला असून अपघातानंतर महामंडळाच्या बसने अचानक पेट घेतल्याने बस जळून खाक झाली आहे. या बसमध्ये अंदाजे एक किंवा दोन प्रवासी (Passengers) असण्याचा अंदाज वर्तविला जात असून अपघातातील जखमींना रुग्णालयात हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांचा (Fire Brigade) घटनास्थळी दाखल होत आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहे.

आप आणि भाजपचं साटंलोटं; राऊतांचा गंभीर आरोप

- Advertisment -

ताज्या बातम्या