Accident# भरधाव डंपरने विद्यार्थिनीला चिरडले

शिवकॉलनी रेल्वे उड्डाणपुलाजवळील घटना; भावाच्या डोळ्यादेखत बहिणीचा करुण अंत
 Accident#  भरधाव डंपरने विद्यार्थिनीला चिरडले

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

कॉलेजमधून भावासोबत दुचाकीवरुन (bike) घरी जाणार्‍या विद्यार्थिनीला (student) मागून भरधाव वेगाने जाणार्‍या डंपरने (speeding dumper) जोरदार धडक (hit hard) दिली. या अपघातात (accident) मनस्वी सुभाष सोनवणे (वय-21, रा. खोटेनगर) ही विद्यार्थिनी (student)डंपरच्या चाकाखाली (wheel of a dumper) चिरडली (Crushed)गेली. ही घटना मंगळवारी दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास शिवकॉलनी (Shiva Colony) रेल्वे उड्डाणपुलावर (railway flyover) घडली. यामध्ये दुचाकीस्वार तीचा भाऊ (brother) नचिकेत सुभाष सोनवणे (वय-25) हा जखमी (wounded) झाला आहे. पोलिसांनी डंपरसह चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत मनस्वी सुभाष सोनवणे
मयत मनस्वी सुभाष सोनवणे

शहरातील खोटे नगरात मनस्वी सुभाष सोनवणे ही विद्यार्थिनी वास्तव्यास असून ती आयएमआर महाविद्यालयात कॉमर्सच्या तिसर्‍या वर्षाला शिक्षण घेत होती. मंगळवारी महाविद्यालयात विद्यार्थिनीची तोंडी परिक्षा असल्याने सकाळी तिचा मोठा भाऊ नचिकेत याने तिला कॉलेजला सोडले.

दुपारी परीक्षा आटोपल्यानंतर नचिकेत हा आपल्या बहिणीला घेण्यासाठी आला होता. दोघ बहिण भाऊ (एमएच 19 सी 7169) क्रमांकाच्या मोपेड दुचाकीने महामार्गावरुन घरी जात असतांना शिवकॉलनीच्या पुढे असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाजवळ मागून भरधाव वेगाने जाणार्‍या ( एमएच 19 सीवाय 3311) क्रमांकाच्या डंपरने दुचाकीला कट मारला. दरम्यान, दुचाकीस्वार नचिकेतचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वार नचिकेत हा रस्त्याच्या कडेला पडला. तर मागे बसलेली त्याची बहिण मनस्वी ही डंपरच्या चाकाखाली चिरडली गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

 Accident#  भरधाव डंपरने विद्यार्थिनीला चिरडले
धुळ्याच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलीस निरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

डंपरसह चालकाला अटक

भरधाव डंपरने धडक दिल्यानंतर वाहतुक पोलिसांनी डंपरसह चालकाला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत मनस्वीच्या पश्चात आई-वडिल, भाऊ नचिकेत असा परिवार आहे. मनस्वी हिचा असा अपघाती मृत्यू झाल्याने सोनवणे कुटूंबियांसह परिसरात शोककळा पसरली आहे.

मुलीच्या मृत्यूमुळे वडील नि:शब्द

बहिण भावाचा अपघात झाल्याची माहिती मिळताच कुटुंबियांसह नातेवईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. यावेळी विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचे कळताच वडीलांसह नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला. तसेच वडीलांना मुलीचा मृत्यू झाल्यामुळे मानिसक धक्का बसल्याने ते नि:शब्द झाले होते.

पप्पा मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही!

मयत मनस्वीचा भाऊ नचिकेत हा सिव्हील इंजिनीअर असून अपघातात त्याच्या डोळ्याला व कमरेला दुखापत झाली आहे. जखमी नचिकेतवर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात हलविले जात होते. परंतु त्याने आपल्या वडीलांना पप्पा पाच मिनीटात झाल हो हे सगळं.., मी ताईचा रिपोर्ट आल्याशिवाय मी येथून कुठेच जाणार नाही. तुम्हाला आणि आईला सोडून कुठेच जाणार नाही असे म्हणाला. यावेळी वडीलांनी मुलाला मिठीमारत दोघांनी अश्रू अनावर झाले होते.

मी दादाच्या गाडीवरुन जाईल!

मनस्वीची आज तोंडी परिक्षा असल्याने सकाळी तीला तिच्या वडीलांनी मी तुला सोडून देतो असे सांगितले. परंतु पप्पा तुमची गाडी जूनी झाली असून त्यावर खूप धूळ असते. त्यामुळे मी नचिकेतदादाच्याच गाडीवर जाईल असे तिने म्हटल्याचे वडीलांनी सांगत आश्रूंना वाट मोकळी करुन दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com