धक्कादायक! नाशिकमध्ये विद्यार्थ्याची वसतिगृहात आत्महत्या

धक्कादायक! नाशिकमध्ये विद्यार्थ्याची वसतिगृहात आत्महत्या

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गंगापूर रोड परिसरातील एका नामांकित महाविद्यालयाच्या वसतिगृहात विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे....

गौरव रमेश बोरसे (२१) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो सटाणा तालुक्यातील डागसौंदाणा येथील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे.

आज (दि. २२) सकाळी गौरव बोरसे राहत असलेल्या शेजारील रूममध्ये राहणारा एक मुलगा इस्त्री मागण्यासाठी गौरवकडे गेला होता. त्याचवेळी वसतिगृहात घडलेला धक्कादायक प्रकार समोर आला.

धक्कादायक! नाशिकमध्ये विद्यार्थ्याची वसतिगृहात आत्महत्या
धोडप किल्ल्यावर जाताय? आधी 'हा' व्हिडीओ एकदा पाहाच...

गौरवने नैराश्यातून आत्महत्या केल्याची हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चर्चा होती, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. गौरव हा वाणिज्य शाखेचा विद्यार्थी होता. तो आपल्या सीए असलेल्या मामाकडे फावल्या वेळात काम करत असल्याचे समजते.

धक्कादायक! नाशिकमध्ये विद्यार्थ्याची वसतिगृहात आत्महत्या
तारक मेहता फेम 'बबिता'चा अपघात

हा प्रकार उघडकीस येताच याबाबत पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला. दरम्यान, हा प्रकार केटीएचएम कॉलेजच्या वसतिगृहात घडल्याचे वृत्त आहे. याप्रकरणी अधिक तपास सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com