Sunday, May 5, 2024
Homeमुख्य बातम्या‘युपीएससी’ परीक्षार्थींसाठी विशेष बस धावणार

‘युपीएससी’ परीक्षार्थींसाठी विशेष बस धावणार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (युपीएससी) दि. 4 ऑक्टोबर रोजी सिव्हील सर्विसेस (पूर्व) परीक्षा घेतली जाणार आहे.

- Advertisement -

या परीक्षेसाठी नाशिक शहर व जिल्ह्यातील उमेदवारांना मुंबई, पुणे व औरंगाबाद येथील परीक्षा केंद्रांवर सोडण्यासाठी नाशिक राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार विशेष बस सोडल्या जाणार आहेत.

मुंबईच्या जिल्हाधिकार्‍यांनी या परीक्षेसंदर्भात एसटी महामंडळाकडे पत्रव्यवहार केला आहे. मुंबई येथे विविध परीक्षा केंद्रावर केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून दिनांक 4 ऑक्टोबर रोजी रोजी सिव्हील सर्विसेस (पूर्व) परीक्षा 2020 दोन सत्रात एकुण 38 उपकेंद्रावर आयोजित केली जाणार आहे.

करोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता या परीक्षेकरीता नाशिक जिल्ह्यातून उमेदवार जाणार आहेत. परिक्षेसाठी उपस्थित राहणा-या उमेदवारांना दिनांक 3, 4 व 5 ऑक्टोबर रोजी मागणीनुसार व आवश्यकतेनुसार नाशिकहून बसेस उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक नितीन मैंद यांनी दिली आहे.

आयोगाकडून नागरी सेवा पूर्व परीक्षा 31 मे 2020 रोजी होणार होती. मात्र, कोरोनाचा फैलाव लक्षात घेऊन पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली. येत्या 4 ऑक्टोबरला मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद आदी शहरांमधील 38 केंद्रांवर परीक्षा पार पडणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या