लोण येथील सैनिकाचा अपघातात मृत्यू

लोण येथील सैनिकाचा अपघातात मृत्यू

अमळनेर Amalner

बदलीच्या ठिकाणी जाणाऱ्या (Going to the place of transfer) आर्मी च्या गाडीचे (Army car) मागचे फाटक तुटल्याने (back gate broken) खाली पडून(lying down) तालुक्यातील लोण येथील सैनिकाचा (soldier) मृत्यू (death)झाल्याची घटना १६ रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली.

लोण येथील लीलाधर नाना पाटील वय ४२ हे आसाम मधील गुवाहाटी येथे सैन्यदलात नोकरीला होते. त्यांचा कार्यकाळ संपल्यानन्तर त्यांनी दोन वर्षे वाढवून घेतले होते. आसामहून ४०० किमीवर अरुणाचल प्रदेशात त्यांची बदली झाल्याने आर्मीच्या ट्रक मध्ये २० जणांची तुकडी नेली जात होती.

लीलाधर हे मागे बसलेले होते. पहाडी रस्त्यात अचानक ट्रक चे मागचे फाटक तुटल्याने लीलाधर खाली पडून दगडाचा मार लागल्याने जागीच ठार झाला.

जवानांच्या डोळ्यादेखत लीलाधर पाटील वाहनातून पडले...अन् क्षणातंच....

सीमा सुरक्षा दलाचो जवान ट्रकमधून पहाडी रस्त्याने अरुणाचल प्रदेश मध्ये जात होते. या वाहनात जवान लीलाधर पाटील हे मागच्या बाजूने बसले होते. याचदरम्यान प्रवासात एके ठिकाणी अचानक जवान जात असलेल्या ट्रकचे मागचे फाटक तुटले. यात काही कळण्याच्या आत मागे बसलेले लीलाधर पाटील हे ट्रकमधून बाहेर खाली पडले. खाली पडल्यानंतर दगडांचा जोरदार मार लागल्याने लीलाधर पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. वाहन थांबवून वाहनातील जवान हे लीलाधर पाटील पडल्याच्या दिशेने धावले. मात्र तोपर्यंत लीलाधर पाटील यांची प्राणज्योल मालवली होती.

दोन महिन्यांपूर्वी कुटुंबीयांची भेट ठरली अखेरची

मयत लीलाधर पाटील यांच्या पश्चात आई मीराबाई, वडील नाना पौलत पाटील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी व तीन भाऊ असा परिवार आहे. लीलाधर यांचा मुलगा सुयश हा नववीत शिकत आहे, तर मोनाक्षी ही सहावीत शिकत आहे. तीन भावंडांमध्ये लीलाधर हे दुसऱ्या क्रमाकांचे होते. त्यांचे मोठे भाऊ रवींद्र पाटील व लहान भाऊ किरण हे दोघेही शेती करतात. लीलाधर पाटील यांना देशसेवेची आवड असल्याने ते सीमा सुरक्षा दलात भरती झाले होते.

लीलाधर पाटील हे दोन महिन्यांपूर्वी रजेवर लोण गावात आले होते. रजा संपल्यानंतर ते पुन्हा दोन महिन्यांपूर्वी कर्तव्यावर रुजू झाले होते. दुर्देवी घटनेत मृत्यू झाल्याने लिलाधर पाटील यांची दोन महिन्यांपूर्वीची त्यांच्या कुटुंबीयांची घेतलेली भेट अखेरली ठरली 

लोण गावातील आणखी एक जवान हा लीलाधर पाटील यांच्याप्रमाणेच सीम सुरक्षा दलात कार्यरत आहे. याच जवानाने लीलाधर पाटील यांचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती गावात कळविली. वडिलांच्या मृत्यूने त्यांच्या दोन्ही मुलांचे पितृछत्र हरपले आहे. 

त्यांचे शव १८ रोजी सकाळी लोण येथे आणण्यात येणार असून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी ,आई वडील ,मुलगा मुलगी असा परिवार आहे. ते वायरमन प्रवीण पाटील यांचे मेव्हणे होत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com