पॅराशूटमधून पडल्याने जवानाचा मृत्यू

पॅराशूटमधून पडल्याने जवानाचा मृत्यू

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

देवळाली कॅम्प ( Deolali Camp ) येथील एअरफोर्सच्या ( Air Force )तुकडीतील एक जवान सिन्नर-घोटी महामार्गावरील घोरवड घाटात पॅराशूटने (Parachute) उडत असताना खाली पडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

एम. एल. यादव ( M.L.Yadav )असे मृत जवानाचे नाव आहे. देवळाली येथील एअरफोर्स दलातील जवान नेहमी घोरवड घाटात पॅरा रायडिंगसाठी येत असतात. येथील डोंगरावरून हे जवान पॅराशूटने उडण्याचा सराव करत असतात. यादव हे आपल्या तुकडीसोबत येथे सराव करण्यासाठी आले होते. डोंगरावरून त्यांनी पॅराशूटने उडान घेतले. थोडावेळ झाल्यानंतर अचानक ते उंचावरून घोटी महामार्गावरील कोनांबे फाटा शिवारात पडले. यामुळे त्यांच्या पायास गंभीर दुखापत झाली.

सोबतच्या जवानांनी त्यांना तात्काळ देवळाली मिलीटरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यूची कागदपत्रे सिन्नर पोलीस ठाण्यात ( Sinnar Police Station )दाखल झाल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश परदेशी करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com