पुढील 'इतके' दिवस किंचित थंडीची साथ अपेक्षित

पुढील 'इतके' दिवस किंचित थंडीची साथ अपेक्षित

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

वातावरणात गुरुवार (दि.२३) पासून काहीसा बदल अपेक्षित असून हरियाणाजवळील (Haryana) वारे (winds) आता क्षीण झाले आहेत.

पुढील ५ दिवस (दि.२८ पर्यंत) पहाटेच्या किमान व दुपारच्या कमाल तापमानात (Maximum temperature) सध्याच्यापेक्षा काहीशी घसरण होऊन दोन्ही तापमाने सरासरी इतके किंवा किंचितशी अधिक राहण्याची शक्यता जाणवते. त्यामुळे महाराष्ट्रात (maharashtra) पुन्हा रात्री हलकासा गारवा जाणवेल. तसेच सध्याचा असलेला दिवसाचा ऊबदारपणाही काहीसा कमी होऊन दुपारचे वातावरणही सुसह्य भासेल, असे हवामान तज्ञ माणिकराव खुळे (Meteorologist Manikrao Khule) यांनी सांगितले.

गेल्या पाच दिवसापासून महाराष्ट्रात विशेषतः मुंबईसह (mumbai), कोकणाला (Konkan) दिवसाच्या उष्णतेने चटका दिला. सौराष्ट्र कच्छ व महाराष्ट्राच्या कोकणपट्टीत सध्या जमीनीपासुन दिड ते दोन किमीपर्यन्तच्या हवेच्या थरात वायव्य अरबी समुद्राहून (arabian sea) म्हणजेच ओमानच्या आखातातुन घडयाळ काट्याच्या दिशेप्रमाणे वाहणारे प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यामुळे हवेचा उच्च दाब तयार झाला आहे. म्हणजेच हवेच्या घनतेत वाढ झाली आहे.

तापलेले हे दिड ते दोन किमी जाडीचे हवेचे पार्सल न विस्कटल्यामुळे व हरियाणाजवळ पश्चिमी झंजावातामुळे घडयाळ काट्याच्या विरुद्ध दिशेने वाहणाऱ्या आवर्ती चक्रीय वाऱ्याच्या स्थितीतुन उत्तर भारतातून आपल्याकडे येणाऱ्या थंड वाऱ्यांना (cold winds) गेल्या काळात अटकाव झाला.

पर्यायाने या मोठ्या आकरमानाच्या हवेच्या उष्ण पार्सलमध्ये थंड वाऱ्यांची (cold winds) सरमिसळ झाली नाही व कोंडलेल्या उष्णतेमुळे (heat) मुंबई, कोकणात उन्हाचा चटका कायम राहीला. विशेषतः कोकण, खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर,सोलापूर जिल्ह्यात दिवसातील दुपारच्या कमाल तापमानात किंचित घसरण झालेली दिसेल. त्यामुळे तेथे दिवसातील उन्हाचा चटकाही कमी होईल. अर्थात येथेही हे तापमान सरासरीपेक्षा किंचित अधिक असु शकते.

शनिवार दि.२५ फेब्रुवारीपासुन नवीन येऊ घातलेल्या पश्चिमी झंजावातामुळे उत्तर भारतात जम्मू काश्मीर (Jammu and Kashmir), हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh), उत्तराखण्ड (Uttarakhand) अशा तीन राज्यात दि.२५ व २६ फेब्रुवारीला गडगडाटीसह पाऊस (rain) व बर्फबारीची (snowfall) शक्यता जाणवते.

प्रत्यावर्ती वारे थांबले तर या महिना अखेरीपर्यंतच्या ५ दिवसात महाराष्ट्रात दोन्ही तापमाने वाढणार नाहीत, परिणामी महाराष्ट्रात आल्हादायक वातावरणाची अपेक्षा आहे. गुजरात (gujrat) व कोकणातील कमाल तापमान पाहता, उन्हाळ्याचे (summer season) वेध लवकर लागलेत असे जरी वाटू लागले तरी देखील थंडीला पूरक अश्या वातावरणीय घडामोडी संपलेल्या दिसत नाही. त्यामुळे अजुनही महाराष्ट्राच्या ठराविक ठिकाणी काहीश्या किंचित थंडीची अपेक्षा आहे.

कोरडे वातावरण राहणार

'रेवट निघालं ', ' आभट आलं ' अशा पाऊस व गारपीट भितीपोटी विचारणा सध्या होत आहे.वर्तमान स्थितीत मध्य भारतात विशेष परिणाम करणारी घडयाळ काट्यादिशेप्रमाणे जमिनीपासून अधिक उंचीपर्यन्त वाहणारे प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्याची गैरहजरी पाहता महाराष्ट्रात कोरडे वातावरण राहून पाऊस अथवा गारपीटीची कोणतीही शक्यता सध्यातरी मुळीच जाणवत नाही.

सध्याच्या गारपीटीच्या कालावधीतून आपण सुरक्षितपणे बाहेर पडत आहोत याची निसर्गाप्रति उपकारक नोंद शेतकऱ्यांच्या मनी असावी, असेही वाटते. गेल्या ५ दिवसात दुपारी ३ ते रात्री १० दुपारी पर्यन्त ज्या शेतकऱ्यांनी कांदापिकाला पाणी भरले असेल तर येत्या १५ दिवसात त्यांनी पिकावर होणारा परिणामाचा अनुभव कळवावा.शक्यतो येथून पुढे दुपारी ३ ते रात्री १० दरम्यानचे कांदा पिकाचे सिंचन करू नये, असा सल्ला हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com