सद्गुरूंच्या कार्यक्रमावर कौतुकांचा वर्षाव

सद्गुरूंच्या कार्यक्रमावर कौतुकांचा वर्षाव

नाशिक। टीम देशदूत Nashik

‘माती वाचवा’मोहिमेचे ( Save Soil Campaign ) जनक आणि ईशा फाउंडेशनचे ( Isha Foundation ) संस्थापक श्री सद्गुरू जग्गी वासुदेव (Shri Sadguru Jaggi Vasudev ) यांच्या संवाद कार्यक्रमाला नाशिकमध्येे लाभलेल्या उदंड प्रतिसादाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यामुळे संयोजकांसह स्वयंसेवकांचा उत्साह द्विगुणीत झाला. एक सामाजिक ज्वलंत विषयावर कोणतेही धार्मिक तत्त्वज्ञान न सांगता केवळ मानव कल्याणाचा विचार प्रत्यक्ष सद्गुरुंच्या उपस्थितीत ऐकून नाशिककर भारावून गेले. सद्गुरुंंनी माती वाचवण्यासाठी दिलेला संदेश आता अंमलात आणण्याचा निर्धार या निमित्ताने व्यक्त होऊ लागला आहे. स्वयंसेवकांच्या सुलभ नियोजनामुळे कार्यक्रम यशस्वी झाला.

दै. 'देशदूत' व 'मराठा विद्या प्रसारक समाज संस्था' यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या संंवाद कार्यक्रमास अभूतपूर्व उदंड प्रतिसाद लाभला.या 'माती वाचवा' कार्यक्रमाचे प्रायोजक दीपक बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स, अ‍ॅग्री सर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, चंंदूकाका सराफ अ‍ॅण्ड सन्स प्रा. लि. , इिंंडयन ऑईल, डेअरी पॉवर लि., धुमाळ इंडस्ट्रीज व रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास होते.

महिला व मुलांचा लक्षणीय सहभाग

या कार्यक्रमास शहरासह जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये लहान मुले, तसेच महिलांचा सहभाग लक्षणीय दिसून आला. माती वाचवण्याच्या या मोहिमेत भावी पिढी सहभागी झाली होते.

नाशिककरांना आश्चर्य

'देशदूत'ने रेडिओ विश्वाससोबत श्रोत्यांसाठी खास रेडिओ फ्रीक्वेन्सीची व्यवस्था केल्याने श्री सद्गुरूंचा संवाद ऐकण्यासाठी आलेल्या नाशिककरांना आश्चर्य वाटले. भाषण इंग्रजीत असल्याने 'देशदूत'ने तंत्रज्ञानाच्या मदतीने भाषणाचे थेट भाषांतर केले आणि रेडिओ फ्रीक्वेन्सीवर थेट मराठीत प्रसारित केले. सद्गुरुचे मराठी भाषांतरातील भाषण नाशिककरांनी ऐकताच टाळ्यांच्या गजरात परिसर दणाणून सोडला. हा कार्यक्रम रेडिओ फ्रीक्वेन्सीद्वारे 96.0 रेडिओ विश्वास वाहिनीवर मराठीत प्रसारित होत असल्याने कार्यक्रमासाठी आलेल्या शेतकर्‍यांनी देशदूतचे मनःपूर्वक आभार मानले.

स्वयंसेवकांमुळे कार्यक्रम सुकर

सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या ‘माती वाचवा’ मोहिमेचा संदेश ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या श्रोत्यांना सुलभ मदत आणि वाहतूक नियोजनासाठी 'देशदूत'च्या पाचशे स्वयंसेवकांची टीम कार्यरत होती. या स्वयंसेवकांच्या सर्व सुलभ नियोजनामुळे ना वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला ना मार्गक्रमणाचा. अत्यंत सौजन्याने अतिथींचे स्वागत या स्वयंसेवकांनी केले. यासाठी एकूण 14 टीम बनविण्यात आल्या होत्या. प्रत्येक टीमला 2 लिडर्स नेमून देण्यात आले होते. सर्व लिडर्स हे मविप्र विधी महाविद्यालयाचे होते. या नियोजनाचा वापर शहर पोलीस प्रशासनाने करत त्यांचा बंदोबस्त याच प्रकारे लावला होता.

स्वयंसेवकांमध्ये शहरातील केटीएचएम महाविद्यालय, देवळाली कॅम्प महाविद्यालय, ओझर मिग महाविद्यालय यांचे एनसीसी कॅडेट्स तर सिडको, मखमलाबाद, विधी महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, केटीएचएम महाविद्यालय यांचे एनएसएस चे विद्यार्थी आणि गरुडझेप, अश्वमेध आणि युनिव्हर्सल अकॅडमीचे विद्यार्थी यांचा समावेश आहे. स्वयंसेवक पाठविण्यासाठी डॉ. योगेश गांगुर्डे, डॉ. योगेश भदाणे, रवींद्र अहिरे, वर्षा शिरुरे, गोरक्षनाथ पिंगळे, योगेश पालवे, शिवाजी सुंभे, युवराज चौधरी, उदय चौधरी, भीमराज गायकवाड, मनोज पाटील, अश्वमेध अकॅडमीचे मनीष बोरस्ते, गरुडझेप अकॅडमीचे लक्ष्मण डोळस युनिव्हर्सल अकॅडमीचे राम खैरनार यांचे सहकार्य लाभले. दिनेश वाघ, अजिंक्य अहिरराव, अदिती झालटे, ज्योत्स्ना कदम, सूरज चव्हाण, नमन अग्रवाल, पंकज मोरे, किरण अहिरे, आकाश सातपुते, हर्षदा पाटील, अंकिता वाघ, प्रतीक्षा टर्ले, श्रेयस तातीया, काजल सिंग, प्रणव कदम, श्रुतिका पवार , सुवर्णा घुमरे, शुभांगी सोनजे, सुचिता आहेर, प्रवीण मोरे, स्वामिनी म्हसलकर, प्रतीक्षा लोहकणे, पूजा परदेशी, नुपूर साळुंखे, जनार्दन मोगल, मंथन साळुंखे, अभिजीत साबळे, शुभम मगर, सौरभ झेंडे आदी टीम लिडर्स होते.

मुलांच्या अभिवादनाने भारावले सद्गुरु

सद्गुरु जग्गी वासूदेव यांच्या स्वागतासाठी अबालवृध्दांनी गर्दी केलेली होती. यासाठी मविप्रच्या विविध शाळेतील मुलांनी देखील रस्त्याच्या कडेला उभे राहून सद्गुरुंना अभिवादन केले. सद्गुरुंनी देखील मुलांच्या जवळून सावकाश वाहन नेत मुलांचे अभिवादन स्वीकारताना भारावले होते. नाशिक शहरात दाखल होताच मुंबई नाका ते केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणापर्यंत मुलानी मानवी साखळी तयार करुन सद्गुरुंचे स्वागत केले.

पोलीस आयुक्तालयापासून महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत मुले रस्त्याच्या दुतर्फा सुमारे 800 विद्यार्थी व सुमारे 150 शिक्षक उभे होते. या उपक्रमात मविप्रच्या होरायझन अकादमी, होरायझन इंटरनॅशनल, उदोजी होरायझन, होरायझन सीबीएससी बोर्ड व आयसीआयसी बोर्डचे विद्यार्थी तसेच मराठी शाळांच्या सुमारे 800 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. दरम्यान मुलांनी पिंपळगाव बसवंत, शिरवाडे फाटा, तसेच ओझर या ठिकाणी मुलांनी सद्गुरुंनी मुलांचे अभिवादन स्वीकारले. त्यात सनराईज स्कूल, होरायझन स्कूल, मविप्रच्या शाळांच्या सुमारे 300 शिक्षकांनी सहभाग घेतला होता. याकामी सुमारे 100 शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

चोख पोलीस बंदोबस्त

मध्य प्रदेशहुन महाराष्ट्रात सद्गुरूंचा प्रवेश होताच विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांच्या सूचनेनुसार सद्गुरूंंना विशेष बंदोबस्त देण्यात आला. त्यानंतर सद्गुरूंचे नाशिक ग्रामीण हद्दीत प्रवेश होताच पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या सूचनेनुसार सद्गुरूंंच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त नाशिक आयुक्तालयाच्या हद्दीपर्यंत देण्यात आला. नाशिक शहरात सद्गुरूंंचा प्रवेश होताच पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या सूचनेनुसार पोलीस ठाणेनिहाय व अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सद्गुरूंचे मविप्रच्या प्रांगणात प्रवेश ते कार्यक्रम संपल्यावर शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये याकरिता सहाय्यक आयुक्त सीताराम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा युनिट क्रमांक 2 दिनकर कदम यांच्या पथकाने ठिकठिकाणी वाहतूक पोलीस तैनात करून शहरात कोठेही वाहतुकीची कोंडी होऊ दिली नाही. कार्यक्रम ठिकाणी उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक आयुक्त दीपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनावणे, पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण, सपोनि सुरवाडे, सपोनि यतीन पाटील, सपोनि भोये, सपोनि खैरनार, उपनिरीक्षक मछिंद्र कोल्हे, उपनिरीक्षक भटू पाटील, उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे,पंकज सोनवणे,अंमलदार श्रीकांत महाजन,जयंत जाधव, शीतल गवळी, शीतल साळवे,शेखर पवार,सुधीर पाटील आदींसह 13 अधिकारी व 225 कर्मचार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवून कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी प्रयत्न केले.

सोशल मीडिया सद्गुरूमय

सद्गुरुंचे ‘माती वाचवा’ या अभियानातील महत्त्वाचा संदेश नाशिककरांनी केटीएचएमच्या प्रांगणात याची देही, याची डोळा तर अनुभवलाच, पण सोशल मीडियादेखील अगदीच सद्गुरुमय झाला होता. जगात माती वाचवा हा संदेश देण्यासाठी दुचाकीने फिरणारे सद्गुरु यांचा सोशलर मीडियावर देखील नेहमीच ट्रेंड चालतो. त्यांचे कोट्स, भाषणे हे विविध पद्धतीने सोशल मीडियावर प्रसारित होत असतात. नाशिकमध्ये देशदूतने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रमोशन करण्यात आले होते. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या हजारो श्रोत्यांनी सद्गुरु यांच्या या मोहिमेला सोशल मीडियावर प्राधान्याने स्थान दिले. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप, यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, 'देशदूत'ची वेबसाईट या माध्यमातून हजारो प्रेक्षकांनी सद्गुरुंचा कार्यक्रम पाहिल्याने अनेकांनी देशदूतचे आभार मानले.

सकाळपासूनच 'देशदूत'च्या सर्व सोशल मीडिया अकाउंट्सवर कार्यक्रमाची लिंक व्हायरल करण्यात येत होती. त्यामुळे कार्यक्रमस्थळी आलेल्या प्रेक्षकांसह आपल्या घरी बसलेल्या प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. कार्यक्रम सुरु होताच देशदूतच्या सोशल मीडियाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. सद्गुरु कार्यक्रमस्थळी कधी पोहोचतील, याची उत्कंठा जमलेल्या सर्व प्रेक्षकांना लागली होती. सद्गुरु येत्या क्षणी अनेक प्रेक्षकांनी सद्गुरुंसोबत सेल्फी, फोटोज, व्हिडीओज घेऊन ते सोशल मीडियावर व्हायरल केले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला तरुणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला.

सर्व माध्यमांवर माती वाचवाचा दरारा दिसून आला. सद्गुरुंचे भाषण सुरु होताच देशदूतच्या सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊसच बघायला मिळाला. सोशल मीडियावर सद्गुरुंसह आकर्षण ठरले ते म्हणजे त्यांची मोटारसायकल. सद्गुरुंच्या भव्यदिव्य मोटारसायकलच्या अनेक जण जणू प्रेमातच पडले. त्यांच्या मोटारसायकलचे फोटो काढण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून आले. अनेक तरुण-तरुणींनी मोटारसायकलचे फोटोही प्रचंड व्हायरल केले. झालेल्या या कार्यक्रमाची चर्चा अजूनही सोशल मीडियावर कायम आहे. त्यामुळे सद्गुरु हे सोशल मीडियावर ‘फेवरेट’ ठरले हे नक्की!

Tweet by Sadhguru

Sadhguru SadhguruJV

Whether individuals live well is subject to many realities, but for ­ll life to live well, rich Soil is the only reality. Wonderful people of Nashik, let us make it happen.

-Sg SaveSoil Save Soil lMaharashtra deshdoot

आजचा सद्गुरू जग्गी वासुदेव यांचा कार्यक्रम अतिशय छान झाला. नाशिकची वैभवशाली परंपरा राखणारा व आपली मान उंच करणारा, अतिशय मोठे असलेले हे कार्य अतिशय सूक्ष्म नियोजन, सर्वोत्तम आयोजन, एक विधायक प्रयोजन आणि एक विस्तृत संयोजन करून आपली एक वेगळी प्रतिभा या निमित्ताने पहावयास मिळाली... खूप खूप अभिनंदन...

देशदूत परिवाराचे अभिनंदन।

- प्रफुल बरडिया, दमयंती बरडिया

कार्यक्रम खूपच छान झाला..

उत्कृष्ट नियोजन, कुठेही गोंधळ नाही..

खूप अभिनंदन आणि धन्यवाद!

गेली 5 ते 6 वर्ष सद्गुरू जग्गी वासुदेव यांना फॉलो करत आहे. कालचा कार्यक्रम कोइम्बतूरच्या शिवरात्रीच्या कार्यक्रमाची आठवण यावी, इतका सुनियोजित झाला.

Yesterday we both attended

the Sadhguru event on SaveSoil organised splendidly by Deshdoot!

It must not have been an easy task to organise such a grand event with such huge number of people attending!

Congratulations and compliments to entire Deshdoot family.

- Sangita, Sanjay Porwal

It was great show yesterday

Very Nicely planned n managed event. Congratulations to you n Team Deshdoot, Expecting most.

Khupch chhan zala over all program suddha. Deshdoot cha management jabardast hota. Sagle volunteers khup mann lavun kaam karat hote. ­ni main mhanje programme nantar traffic khup chhan manage kele especially single line of 2 wheelers ani chalnare pan.

- Dr. Prashant Devre

Well organised Event, fantastic coordination overall Event was superb loved it.!!

- Reaction from my all friends who attended Event

Great event yesterday. Congratulations to team Deshdoot.

- Pratiksha Kothule, Nature Conservation Society of Nashik

Congratulations for the wonderful event, it was great effort to ensure seamless event with such a huge participation.

- Mr. Mathur, NEC

Hats off to the arrangement done for today’s programme. Happy to be part of an audience today

- Kapil Patil, Manager HDFC

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com